22 व्या वर्षात पदार्पण, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती!
नागपूर (Deshonnati 21st Anniversary) : शेतकरी, भूमिपूत्र आणि कष्टकर्यांचा आवाज बुलंद करणारे आणि ग्रामीण महाराष्ट्राचा आत्मा म्हणून ओळखल्या जाणार्या दैनिक देशोन्नतीच्या नागपूर आवृत्तीचा 21 वा वर्धापन दिन अत्यंत साधेपणाने तितक्याच थाटात शनिवारी साजरा झाला. समाजातील विविध क्षेत्राीलव मान्यवर वाचकांनी देशोन्नतीच्या धंतोली येथील कार्यालयात भेट देत शुभेच्छा दिल्या. दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे (Deshonnati Chief Editor Prakash Pohre) यांनी या शुभेच्छांचा स्वीकार केला.
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने सुरुवात!
सर्वप्रथम माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) अनिल देशमुख (Anil Deshmukh) व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन (Lighting The Lamp) करण्यात आले. यानंतर माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार (Sunil Kedar), खासदार श्यामकुमार बर्वे (MP Shyam Kumar Barve), नागपूर शहराचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल (Nagpur Police Commissioner Dr. Ravindra Single), माजी खासदार सुबोध मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवा नेते सलील देशमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, बाबासाहेब कंगाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (ऑनलाी रजिस्ट्रेशन) जनार्दन मून गुरुजी, शेखर सूर्यवंशी, प्रकाश कुंभे आदी अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
उत्तरोत्तर रंगत गेलेला, हा सोहळा उशिरापर्यंत, सुरू…
असंख्य वाचक, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक यांच्या साक्षीने हा सोहला पार पडला उत्तरोत्तर रंगत गेलेला हा सोहळा रात्री उशिरापर्यंत, सुरू राहिला. या सोहळ्यास प्रशासकीय, राजकीय शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आदी विविध क्षेत्रासह वाचकांनी उत्स्फूर्त हजेरी लावत देशोन्नतीला शुभेच्छा दिल्या.