पोहरादेवी तीर्थक्षेत्रातील विकास कामे लवकरात-लवकर मार्गी लावण्यात यावी!
मानोरा (Development Plan) : श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास योजना तसेच उमरी खुर्द आणि पोहरादेवी तीर्थक्षेत्रातील (Pohradevi Pilgrimage Site) विकास कामे लवकरात-लवकर मार्गी लावण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे (Guardian Minister N. Dattatreya Bharane) यांनी अधिकाऱ्यांना दि. 14 ऑगस्ट रोजी बंजारा विरासत नंगारा भवन म्युझियम येथे पार पडलेल्या बैठकीत दिले.
विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित!
याप्रसंगी आढावा बैठकीला आ. बाबुसिंग महाराज राठोड, आ. सईबाई डहाके, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री भरणे म्हणाले की, निधी अभावी प्रलंबित असलेल्या कामासाठी शासन स्तरावर बैठक घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पार्किंग, भक्तनिवास, प्रकाश योजना, हरितकरण, आणि सुरक्षा बाबीवर चर्चा करण्यात आली. विकास आराखड्यांना गती देण्यासाठी विभागामध्ये समन्वय साधावा, निधीचा पारदर्शक व गुणवत्तापूर्वक वापर करावा आणि पोहरादेवी हे राज्यातील आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल, असे सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली.