मानोरा (Dhoni Illegal businesses) : आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढोणी येथे अवैध धंद्यांना ऊत आला असून सदर अवैध धंदे बंद करावेत अशा प्रकारचे निवेदन दि. 9 जुलै रोजी ठाणेदार यांना तंटामुक्ती अध्यक्ष परसराम ढंगारे, पोलीस पाटील राजेश व्यवहारे व नागरिकांनी दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, गावात गेल्या बऱ्याच वर्षापासून मोठ्या प्रमाणात मटका, गावठी दारू व इतर (Dhoni Illegal businesses) अवैध धंदे जोरात चालू असून या अवैध धंद्यामुळे बऱ्याच सुज्ञ कुटुंबावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांवर सुद्धा अवैध धंद्याचा परिणाम होत असून बरेचसे कुटुंब या अवैध धंद्यामुळे उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच गावात दिवसेंदिवस तंटा वाढत असून सदर तंट्याला कारणीभूत गावातील अवैध धंदे आहेत. या धंद्यामुळे महिलांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा अवैध धंदे चालविणारांच्या मुसक्या आवळाव्या व गावात शांतता अबाधित राहावी, त्यासाठी सुसाट व खुलेआम चालणारे (Dhoni Illegal businesses) अवेध धंदे बंद करावे, अशी मागणीचे निवेदन नागरिकांनी दिले आहे.




