परभणीच्या पुर्णेत दिव्यांगांचे आंदोलन कार्यवाही करण्याची मागणी!
परभणी (Disability Fund Expenditure) : परभणीतील पूर्णा तालुक्यातील दिव्यांगांचा ५ % निधी खर्च करण्यास टाळाटाळ करणार्यांना वरिष्ठ पाठीशी घालत आहेत. असा आरोप करत संतप्त दिव्यांग आंदोलकांनी पुर्णेत गटविकास अधिकार्यांना घेराव घातला. टाळाटाळ करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
अधिकार्यांनी थातूरमातूर उत्तर दिल्याने आंदोलक संतप्त!
दिव्यांगांच्या हक्क आणि न्याय मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवार १३ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांच्या नेतृत्वात पंचायत समिती (Panchayat Committee) येथे आंदोलन झाले. आंदोलकांनी गटविकास अधिकार्यांनी प्रांगणात बोलावत आपल्या मागण्यांचा पाढा वाचला. अधिकार्यांनी थातूरमातूर उत्तर दिल्याने आंदोलक संतप्त झाले. ग्रामसेवकांना निधी खर्च करण्यास पैशाची कशामुळे मागणी केली जाते असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केल्याने अधिकारी निरुत्तर झाले. निधी खर्च न करणारे ग्रामसेवक (Gram Sevak) यांच्यासाठी भेट देण्याकारीता आंदोलकांनी दोन रेडे देण्याचे नियोजन लावले होते.
येत्या 10 दिवसात सर्व मागण्या मान्य करत प्रकरण मार्गी लावण्याची मागणी!
रेडे सजवून देखील आणण्यात आले होते. मात्र संबंधित ग्रामसेवक न फिरकल्याने आता हे रेडे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) यांना पाठविणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. येत्या दहा दिवसात सर्व मागण्या मान्य करत प्रकरण मार्गी लावण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलक पंचायत समिती आवारात ठिय्या मांडून बसले. यावेळी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी फोन करून गटविकास अधिकार्यांना (Group Development Officer) चांगलेच सुनावले असल्याची माहिती मिळाली आहे.