Digras :- तालुक्यातील विठाळा येथील एका दिव्यांग (handicapped) शेतकर्यांने सततची नापिकी त्यात अतिवृष्टीमुळे विवंचनेत राहत होता. याला कंटाळून त्याने आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज १८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान घडली.
सततची नापिकी व यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक येणार नाही म्हणून केली आत्महत्या
जगदीश हरजी राठोड (४२) रा.विठाळा असे मृत दिव्यांग शेतकर्याचे नाव आहे. दिव्यांग शेतकरी यांच्या नावाने अडीच एकर शेती असून त्या शेतीमध्ये तूर, कापूस पेरणी केली होती. सततची नापिकी व यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain)पीक येणार नाही या विवंचनेत त्याने घरातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. सदर मृतक शेतकर्याचे दोन्ही पाय दिव्यांग असून त्याने घरातच विष प्राशन (poison solution) केल्याचे नातेवाइकांच्या लक्षात येताच त्याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत (Dead)घोषित केले. मृतकाच्या पश्चात पत्नी, १ मुलगी असा परिवार आहे.