उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू…
हिंगणघाट (Woman Accident) : हिंगणघा येतील तहसील कार्यालय परिसरात आज सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान झालेल्या अपघातात एका ७४ वर्षीय दिव्यांग निराधार महिलेचा (Woman Accident) दुर्दैवी मृत्यू झाला. निराधार योजनेचा कामा संदर्भात ही महिला तहसील कार्यालयात आली होती. उपविभागीय अधिकारी यांच्या कार पार्किंग पुढे अगदी तहसील कार्यालयाच्या आवारात हा अपघात झाला.
मृतक महिला शहरातील संजय गांधी शाळेमागील न्यू यशवंतनगर येथील रहिवासी असून सावित्रीबाई राजाबाबू तिवारी अशी तिची ओळख आहे.
दुपारी ही मृतक महिला (Woman Accident) सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान ती महिला संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाकरिता आली होती. कामकाज आटोपुन ही महिला तहसील कार्यालयाचे आतील मुख्य द्वारासमोरचे परिसरात आली,याच परिसरातून निघालेल्या कार क्रमांक एम एच ३२- एएन ८४४४ ने चिरडून काढले.
परिसरातील उपस्थित काही नागरिकांनी या कार मधील ३ इसमाना दमदाटी करून (Woman Accident) महिलेला उपचारार्थ दाखल करण्यास सांगितले. कारचालक व इतरांनी सदर महिलेला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व या दरम्यान या तिघांनी तेथून कार क्र. एम एच ३२- एएन ८४४४ सह पळ काढला.
अपघातादरम्यान तिचे जवळ असलेल्या आधार कार्डवरती असलेल्या मोबाईल क्रमांकावरून तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. (Woman Accident) मृतक महिलेचे कुटुंबीय स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले असता त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी कळविले. सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत दुर्गे, पोलिस कर्मचारी अंगेश्वर चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.