आपत्तीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी NDRF, SDRF चे 1 दिवसीय प्रशिक्षण!
पारशिवनी (Disaster Management) : पावसाळ्यातील आपत्तीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी दिनांक 22/05/25 ला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन (Natural Disaster Management) तसेच मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन याचे प्रशिक्षण नवेगाव खैरी येथे मा. तहसीलदार श्री सुरेश वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. तसेच नायब तहसीलदार रमेश पागोटे यांचे समवेत मंडल अधिकारी, तलाठी, सर्व पंचायत विभाग, पोलिस विभाग, होमगार्ड, पोलिस पाटील, आपदा मित्र व इतर यांना NDRF, SDRF तर्फे प्रशिक्षण देण्यात आले.
NDRF चे प्रमुख ब्रिजेश कुमार यादव यांनी खालील मुद्द्यांवर माहिती दिली.
प्रशिक्षणादरम्यान, पावसाळ्यापूर्वी काय व्यवस्थापन करायला हवे याचा आढावा NDRF चे प्रमुख ब्रिजेश कुमार यादव यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितले. NDRF व SDRF म्हणजे काय, यांचे विभाग प्रमुख कोण व या फोरमचे उद्देश्य त्यांनी समजावून सांगितले. डिझास्टर चे प्रकार, व प्रत्येक प्रकारांतर्गत कोणकोणते डिझास्टर आहेत, तसेच Cardiac Arrest, Electric Current लागल्यानंतर संबंधिताला सीपीआर (CPR) देण्याची पद्धत, Adults, Child व Infant यांना सीपीआर वेग-वेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे द्यावे हे त्यांनी प्रशिक्षणादरम्यान सांगितले. ब्लड कंट्रोल चे 4 प्रकार कोणते त्याविषयी माहिती दिली. पूर परिस्थितीमध्ये स्टॅंडर्ड डिवाइस (Standard device) उपलब्ध नसल्यावर घरगुती वस्तूंच्या सहाय्याने कसे रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation) करता येतील, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणात सांगितले.
SDRF चे मुख्य खोब्रागडे सर यांनी पूर परिस्थितीत मदत कार्याचे सर्व प्रात्यक्षिके करून दाखविली.
मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) काळात कुठल्याही प्रकारची जीवित हानी होणार नाही, याची खबरदारी कशी घ्यावी. याविषयी SDRF चे मुख्य खोब्रागडे सर यांनी मार्गदर्शन केले. घरघुती वस्तूंपासून गुंडफडी (Gundaphadi) कशी तयार करायची व बॉटल बेल्ट, रोप नॉट इत्यादी वस्तू कश्या तयार करायच्या, तसेच त्याचा वापर कसा करायचा याची सखोल माहिति दिली. पाण्याच्या ठिकाणी फिरायला गेल्यास लाईफ बॉय व लाईफ जॅकेटचा वापर करावा असे त्यांनी सांगितले.
आपदा मित्र हे मदतकार्यासाठी नेहेमी तत्पर!
गावपातळीवर आपदा मित्र (Aapda Mitra) हे मदतकार्यासाठी नेहेमी तत्पर असतात. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकही केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मान्सूनमध्ये होणाऱ्या आपत्तीपासून नक्कीच बचाव करता येईल.
प्रशिक्षणाला उपस्थित NDRF जवान
ब्रिजेश केआर यादव, महेश भावसार, विनोद केआर जेदे, जीडी ठाकरे गोपाळ, आरओ नाकाडे मनोज, डीव्हीआर ए. डी. गोवेकर, डीव्हीआर दीपक पाटील
प्रशिक्षणाला उपस्थित SDRF जवान
पोनी जी. जे. खोब्रागडे, एस. एस. चव्हाण, एस. एस. अब्रूक, ए. पो. तलखंडे, आर. सो. वाळके, पी. डी. लिल्हारे, एल. एस. जाधव, जी शेख
प्रशिक्षणाला उपस्थित आपदा मीत्र
मास्टर ट्रेनर आपदा मीत्र श्याम मस्के, धीरज सोमकुवर, गौरव तीरोडे, रीतीक अमृते, मनोज मोहने, साहिल अमृते, धीरज सोमकुवर, धनराज बडवाईक, आपदा सखी प्राजक्ता पाटील इत्यादी उपस्थित होते.