Gadchiroli :- गेल्या ४८ तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पुर येऊन अनेक मार्ग बंद पडले आहेत. दरम्यान अतिवृष्टीमुळे (heavy rain)धरणातून विसर्ग वाढला असल्याने नद्या फुगल्या आहेत. यामुळे पुराचा धोका कायम असल्याने प्रशासनाने नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द प्रकल्पाच्या ३३ गेट पैकी १५ गेट उघडले असून त्यामधून १, ८०१ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नागरीकांना सावध राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ गेट उघडले असून त्यामधून १०,५९३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.निम्न वर्धा प्रकल्पाच्या ३१ गेट पैकी १९ गेट उघडलेले असून यामधून ५०५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. श्रीराम सागर प्रकल्पाच्या ४२ गेट पैकी १६ गेट उघडले असुन १,४९७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे ६४ पैकी ४० गेट उघडले असुन १५,१५७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच मेडीगड्डा बॅरेजचे ८५ पैकी ८५ गेट सुरू करण्यात आले असून यामधून २८,५३० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
आष्टी स्टेशनवर वैनगंगा नदीच्या (Wainganga River) पाण्याची पातळी इशारा पातळीच्या वर स्थिर आहे. मात्र, वडसा आणि चिचडोह बॅरेज येथे वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.सिरपूर टाऊन स्टेशनवर, वर्धा नदी इशारा पातळीच्या वर स्थिर वाहत आहे.अहेरी गुडम स्टेशनवर, प्राणहिता नदी इशारा पातळीच्या वर वाढत आहे.कालेश्वरम स्टेशनवर, गोदावरी नदी इशारा पातळीच्या वर वाढत आहे. गोदावरी नदी चिंदनार, जगदलपूर आणि पाथागुडम स्टेशनवर, नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली कमी होत आहे