तुमसर-मोहाडी राष्ट्रीय महामार्गावरील एमआयडीसी शिवारातील दूध कंपनीचा प्रताप
नागरीकांसह पाळीव जनावर, वन्यप्राण्यांना दूषीत पाणी ङ्खरते ‘विष’
नागरीकांसह पाळीव जनावर, वन्यप्राण्यांना दूषीत पाणी ङ्खरते ‘विष’
तुमसर (Milk Dairy Farm) : तुमसर-मोहाडी राष्ट्रीय महामार्गावरील मोहाडी एमआयडीसी शिवारातील दुग्ध संकलन केंद्रातील रसायनयुक्त दूषीत पाण्याची विल्हेवाट चक्क येथील दुग्ध कंपनी चालक तुमसर-मोहाडी राष्ट्रीय महामार्गावरील शेत शिवारात सदर दूषीत पाण्याची विल्हेवाट लावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील (Milk Dairy Farm) दूषीत रसायनयुक्त पाण्याची उग्र स्वरुपाची दुर्गंधीययुक्त वास येत आहे व सदर रसायनयुक्त पाणी येथील शेतकर्यांच्या शेतात जात असल्याने शेतकर्यांना शेती करण्यास अडचण निर्माण झाली आहे. परिणामी रसायनयुक्त पाणी येथील नागरीकांच्या आरोग्याला व पाळीव जनावर व वन्य प्राण्यांना धोकादायक ङ्खरत आहे.
तालुक्यातील तुमसर-मोहाडी शिवारात एमआयडीसीमध्ये एक दूध संकलन केंद्र आहे. येथील (Milk Dairy Farm) दूध कंपनीकडून कंपनीतील दूषीत व रसायनयुक्त पाणी तुमसर-मोहाडी राष्ट्रीय महामार्गावरील शेत शिवारात सोडले जात आहे. परिणामी येथील शेतकर्यांना शेतीच्या दृष्टीने त्रासदायक ङ्खरत असून आरोग्याला हानिकारक ङ्खरत आहे.
सदर दूषीत पाण्यामुळे परिसरात मोङ्ग्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. दूषीत पाण्याने शेतातील अनेक जिवजंतू मृत्यूमुखी पडले आहेत. परिणामी शेती मृद होण्याची दाट शक्यता आहे. कदाचित सदर दूषीत पाणी येथील जनावरांनी नकळत पिल्यास वन्यजीव अथवा पाळीव जनावरे दगावण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सदर पाणी शेतात जात असल्याने शेतकर्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून येथील नागरीकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. तरी संबधित पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून संबधित दूध कंपनी चालकांवर कारवाई करण्याची मागणी येथील शेतकर्यांसह नागरिकांनी केली आहे.
शेतकर्यांचा आंदोलनाचा इशारा
तुमसर-मोहाडी राष्ट्रीय महामार्गावरील मोहाडी एमआयडीसी शिवारातील दूध कंपनीचे रसायनयुक्त दूषीत पाणी तुमसर-मोहाडी मार्गावरील शेतशिवारातील सोडले जात आहे. परिणामी शेतीला धोका निर्माण झाला आहे. (Milk Dairy Farm) दुर्गंधीने येथील शेतकर्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाळीव जनावरे व वन्यप्राणी मृत्यूमुखी पडण्याची शक्यता आहे. तरी पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाने संबंधित दूध कंपनी चालकांवर कारवाई करावी. अन्यथा कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकर्यांनी दिला आहे.