चंद्रपूर (District Central Bank) : तब्बल १३ वर्षानंतर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रीया आज गुरूवार दि.५ जूनला जाहीर होताच आज नामांकन अर्ज दाखल करावयाच्या पहील्याच दिवशी (District Central Bank) बँकेचे माजी संचालक तथा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी ‘अ’ गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज पाच जणांनी नामनिर्देशन पत्र विकत घेतले. येत्या ११ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार आहे. सहकार क्षेत्रात महत्वाची मानली जाणारी ही निवडणूक यावेळी चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.पहील्यांदाच आमदार, खासदार, माजी मंत्री बँकेच्या निवडणूकीत सक्रीय झाल्याने चुरस वाढली आहे. बॅकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातील परस्पर विरोधक असणारे नेतेमंडळी यावेळी अभद्र युत्या करून पॅनल लढविणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा हे ओळखणे कठीण होणार आहे.
काँग्रेस व भाजपाचे काही नेते एकत्रीत पॅनल लढविण्याच्या हालचाली करीत असतांना दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांचे नेते (District Central Bank) बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र यावे यासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
२१ संचालकांसाठी होणार्या या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्राची छाणनी १२ जूनला छानणी होईल. १३ ते २७ जून या दरम्यान नामनिर्देशन पत्र मागे घेतले जातील. उमेदवारींची अंतिम यादी ३० जूनला प्रसिद्ध केली जाईल. १० जुलै मतदान आणि ११ जुलैला मतमोजणी होईल. त्यानंतर बँकेला नवा अध्यक्ष मिळेल.