राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
देसाईगंज (District Selection Committee) : वयपरत्वे थकत चाललेल्या कलावंतांना वृद्धापकाळात आर्थिक मदतीचा हात म्हणून वयाच्या ५० व्या वर्षापासून वृद्ध कलावंत पेंशन योजना लागु करण्यात आली.या योजनेंतर्गत पन्नाशी पार केलेल्या वृद्ध कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाते.
मात्र या योजनेचा लाभ घेणारे वृद्ध कलावंत पात्र करण्यासाठी आवश्यक असलेली (District Selection Committee) जिल्हा निवड समितीच गठीत करण्यात आली नसल्याने शेकडो पात्र वृद्ध कलावंत या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित आहेत. तब्बल दिड वर्ष लोटुनही सादर केलेले अर्ज अद्यापही धुळ खात पडून असल्याने वृद्ध कलावंतांची होत असलेली हेळसांड थांबविण्यासाठी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
कित्येक वर्ष रंगभूमीत कार्यरत राहुन समाजप्रबोधन करण्यासह शासनाच्या विविध योजना मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्यात मौलिक भुमिका कलावंत पार पाडतात.अख्ख आयुष्य समाजसेवेत घालविल्यानंतर वृद्धापकाळात कलावंतांना कोणासमोरही हात पसरण्याची वेळ येऊ नये करीता वयाची पन्नाशी पार केलेल्या व वृद्धत्वाकडे झुकत चाललेल्या कलावंतांना त्यांच्या पडत्या काळात आर्थिक मदतिचा हात म्हणून वृद्ध कलावंत पेंशन योजना अंमलात आणल्या गेली आहे. मात्र ही (District Selection Committee) योजना पात्र कलावंतांना लागु करण्यासाठी जिल्हा निवड समितीच गठीत करण्यात आली नसल्याने पात्र शेकडो वृद्ध कलावंतांचे अर्ज जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे धुळखात पडुन आहेत.
विशेष म्हणजे या निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असुन (District Selection Committee) निवड समिती गठित करण्याचे पुर्ण अधिकार पालकमंत्र्यांकडे आहेत. सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्रीच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना व येथील झाडिपट्टी रंगभूमी पंचक्रोशीत प्रसिद्ध असतांना येथील कलावंतांना यथोचित न्याय देण्यासाठी लक्षच दिल्या जाऊ नये, याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केलेल्या खर्या कलावंतांना मानधन लागु करण्यासाठी यथाशिघ्र निवड समिती गठित करून न्याय देण्याची मागणी येथील वृद्ध कलावंतांनी केली आहे