कोरची (Ganeshotsav) : शासनाने डीजे व लेजरवर बंदी घातली आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळांनी गणेशोत्सवात डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करावे तसेच गणेश स्थापनाकरिता नियमानुसार परवानगी घ्यावी, ज्या मंडळाने नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची सूचना कोरची पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी शांतता सभेत केली.
मंडळांच्या सदस्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू देणार नाही व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन २५ ऑगस्ट रोजी दिले आहे. कोरची येथे शांतता सभेचे अध्यक्ष तहसीलदार प्रशांत गड्डम, प्रमुख पाहुणे नगरपंचायत नगराध्यक्ष हर्षलता भैसारे, सार्वजनिक बांधकाम अभियंता महेश हाडके, एमएस सीबी अभियंता हुकम, पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस स्टेशन हद्दीतील प्रथम नागरिक, पोलीस पाटील, गणेश मंडळाचे सदस्य, विविध राजकीय पक्षाचे प्रमुख नेते, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या शांतता सभेचे अध्यक्ष तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी गणेशोत्सव (Ganeshotsav) ते दिवाळी महोत्सवापर्यंत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
विविध जाती धर्मातील लोकांसोबत आपुलकीची भावना ठेवून शांतता ठेवावे तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकांची प्रक्रिया सुरू झाली असून निवडणुकी पूर्वी मतदारांनी आपली नोंदणी एकाच ठिकाणी ठेवावी दोन ठिकाणी असलेल्यास एक नाव काढून घ्यावे असे सांगितले आहे. यानंतर तालुक्यातील सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, मंडळ सदस्य व विविध पक्षातील नेत्यांनी आपले मते मांडली. या कार्यक्रमाचे संचालन नायक पोलीस शिपाई यशवंत जुमनाके तर आभार सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले.