दहा लाखाचा मुद्देमाल जप्त!
मंगरुळपीर (Domestic Liquor Transportation) : मंगरुळपीर येथे अवैध देशी/विदेशी दारु वाहतुकीवर दिनांक 17 मे रोजी धडक कारवाई करुन 10 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी विरुद्ध कलमा नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 17/05/2025 रोजी मंगरूळपीर येथील सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी (Sub-Divisional Police Officer) वाशिम व मंगरुळपीर येथील कार्यालयीन स्टॉफसह मंगरुळपीर शहरात जि. प. ग्राउंड जवळ शेलुबाजार कडे जाणाऱ्या रोडवर अवैध देशी विदेशी दारुची (Domestic and Foreign Liquor) वाहतूक करणाऱ्या आरोपी विशाल श्रीराम शिवहरे वय 26 वर्षे रा. जयस्तंभ चौक कारंजा गजानन टेकराव चौकशे रा. जयस्तंभ चौक कारंजा यांचेकडून बोलेरो वाहन क्रमांक MH-40-BQ-5786 सह देशी/विदेशी दारु किंमत 201220/- रुपये, बोलेरो वाहन व मोबाईल असा एकुण 1011220/- (दहा लाख अकरा हजार दोनशे विस) रुपयाचा मुद्देमाल जप्त (Confiscation of Goods) करण्यात आला.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा भारतीय न्यायसंहीता प्रमाणे नोंद करुन कार्यवाही!
दारुचा पुरवठा करणारे रोहीत लुल्ला, वैभव (काल्या), अनुप, भोला, गोलु, तन्नु दिपक शिवहरे, मंगेश जाधव रा. पारवा,बाबु ठाकुर रा. मंगरुळपीर, व दारु खरेदी करणारे दारासिंग राठोड रा. भडशिवणी, गौतम रा. खडी धामणी, राम रा. कामरगांव, बाळु वैरागळे रा. खेर्डा, पिंटु किर्दक रा. काकडशिवणी, पुंडलीक पवार रा. भडशिवणी, प्रकाश वानखेडे रा.बांबर्डा,. उमेश रा. मोखड पिंप्री, अंकुश रा. आखतवाडा, अतुल शिंदे रा. खेर्डा, उदयसिंग राठोड रा.विळेगांव, गुलाबराव तायडे रा. बांबर्डा, धिरज खराड रा. पोहा, संतोष रा. पोहा, गौतम इंगोले रा. पारवा कारंजा, सिध्दार्थ रा. चांधई ता. कारंजा, यांचेवर पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा (Maharashtra Prohibition Act) कलम 65 ई सह कलीम 3(5) भारतीय न्यायसंहीता प्रमाणे नोंद करुन कार्यवाही केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची धाडसी कारवाई!
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक वाशिम (Superintendent of Police Washim) श्री. अनुज तारे (IPS), श्रीमती लता फड अपर पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या मार्गदर्शनाने श्री. नवदीप अग्रवाल सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग वाशिम यांचेसह उविपोअ येथील कार्यालयीन स्टॉप सपोनि अतुल इंगोले, येथील पोहेकॉ /747, रविद्र कातखेडे पोकों/1468 अनंता डौलसे, पोकॉ/316 सुमीत चव्हाण व उपविपोअ कार्यालय वाशिम येथील पोहेकों गणेश बाजड पोकों शंकर वाघमारे यांनी पार पाडली.