डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा भावपूर्ण सत्कार
अमरावती (CJ Bhushan Gavai) : श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) विधी महाविद्यालयाचे माझ्या यशात मोठे योगदान आहे. महाविद्यालयाला अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडावे तसेच देशाची व समाजाची चांगली सेवा या पदावरून करता यावी असा आशावाद व्यक्त करून (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाचे (CJ Bhushan Gavai) सरन्यायाधीश भूषण गवई यांनी डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे असे प्रतिपादन केले.
डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) विधी महाविद्यालय अमरावती येथे आज भारताच्या (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई (CJ Bhushan Gavai) यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तर मुख्य अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माजी न्यायाधीश विजय आचलिया, प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई (CJ Bhushan Gavai) यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी विराजमान झाल्यानंतर ज्या महाविद्यालयाने आपल्याला घडविले त्या महाविद्यालयाला भेट देऊन त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था व डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा सत्कार स्वीकारला. आयुष्याच्या जडणघडण मध्ये अनेकांचा मोठा वाटा असला तरी डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालयाने दिलेली शिकवण माझ्यासाठी महत्त्वाची आहे. महाविद्यालयात मिळवलेल्या मार्गदर्शनामुळेच चांगल्या ठिकाणी पोहोचता आले.
हे यश सर्वांचे असल्याचे नमूद करून भविष्यात महाविद्यालयाला अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडेल अशी आशा व्यक्त करत त्यांनी उपस्थितांकडून आशीर्वाद घेतले. फार कमी लोकांना या पदावर काम करण्याची संधी मिळते. परंतु या संधीचे सोने करून आपण श्री शिवाजी शिक्षण संस्था व महाविद्यालयाला अभिमान वाटेल असेच काम करणार आहे डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) विधी महाविद्यालयाने या पदापर्यंत पोहोचविले त्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी देखील सरन्यायाधीश भूषण गवई (CJ Bhushan Gavai) यांच्या कार्याचा गौरव करून श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी हा बहुमान असल्याचे सांगितले. ज्या माध्यमातून त्यांनी हे मोठे यश संपादन केले याची जाणीव ठेवून ते वागतात, ही फार मोठी इतरांसाठी आचरणाची गोष्ट असल्याचे हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले. संविधानाचे कार्य भूषण गवई यांच्या माध्यमातून वृद्धिंगत होईल असा आशावाद देखील हर्षवर्धन देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला.
यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजाननराव फुंडकर, ॲड. भैय्यासाहेब उपाख्य जयवंत पाटील (पुसदेकर), कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ, प्रा.सुभाष बनसोड, सचिव वि.गो.ठाकरे, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ.अंबादास कुलट, प्राचार्य डॉ.अमोल महल्ले, ॲड.प्रदीप महल्ले, ॲड .अमर देशमुख,अमरावती बार असोसिएशनचे अध्यक्षॲड .सुनील देशमुख, डॉ .अंजली ठाकरे,विविध महाविद्यालयाचे प्राचार्य,श्री शिवाजी शिक्षण संस्थे अंतर्गत कार्यरत विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी केले. संचालन डॉ. राधिका देशमुख व आभार प्रदर्शन डॉ. प्राची कडू यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) विधी महाविद्यालयाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई (CJ Bhushan Gavai) यांचा सन्मानचिन्ह व भव्यपुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला.