सिंदखेडराजा (Dr. Rajendra Shingane) : तुतारी वाजविणारा माणूस, या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार्या डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांच्या निवडणुकीत आणखी एक तुतारी महत्वाची ठरते आहे अन् ती तुतारी म्हणजे.. अजीम नवाज राही यांच्या वाणीची तुतारी !
सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाची निवडणूक अनेकार्थाने गाजते आहे. महायुतीची या मतदारसंघात युती नसणे अन चौरंगी लढतीत यापूर्वी घड्याळ या निशाणीवर निवडून आलेल्या शिंगणे यांच्या विरोधात घड्याळ अन पूर्वीचा धनुष्यबाण असणे. राजकारणातले हे सारे गणिते यावेळी बदलले दिसत जरी असले तरीही मोठे साहेब ते डॉ. शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांच्या ह्या प्रवासात एकच गोष्ट बदलली नाही अन ती म्हणजे अजीम नवाज राहींची वाणी सोबत असणे.
शिंगणे परिवाराच्या तोरणदारी अन् मरणदारी अजीम नवाज राही यांच्या वाणी वाणी कायम वाहत असते. स्व भास्करराव शिंगणे यांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते या तुतारीच्या निवडणुकीपर्यंत आणि शिंगणे परिवाराच्या सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात अजीम नवाज राहीची वाणी कानी पडत असते. मग स्व.भास्करराव शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ऐतिहासिक सोहळ्याचे शरद पवार यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असो की, भावनिक किनार असलेल्या मोठ्या साहेबांच्या स्मृतिदिनाचे सूत्रसंचालन असो!