मुलगी खात होती स्वतःचीच केस
डॉक्टर उषा गजभिये यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
मुलीच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा
अमरावती (Amravati Hospital Surgery) : सातत्याने केस खाणाऱ्या एका दहा वर्षीय मुलीच्या पोटातून चक्क अर्धा किलो केसाचा गोळा काढून तिला डॉक्टरांनी जीवदान दिले. डॉक्टर उषा गजभिये (Dr. Usha Gajbhiye) यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. अचलपूर तालुक्यातील एक दहा वर्षीय मुलगी पोटाच्या आजाराने त्रस्त होती. तिला जेवण घेणे सुद्धा कठीण झाले होते.
सातत्याने उलट्या होत होत्या आणि तिचे पोट फुगलेले वाटत होते. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला डॉक्टरांना दाखविले. तिची (Amravati Hospital Surgery) सोनोग्राफी केली मात्र सोनोग्राफिक फार काही दिसून आले नाही. तिचे सिटीस्कॅन सुद्धा करण्यात आले होते. त्यांना डॉक्टरांनी वेगवेगळे सले दिले. मात्र पालकांचे समाधान होत नव्हते. त्यानंतर त्यांना कुणीतरी परिचितांनी डॉ. उषा गजभिये (Dr. Usha Gajbhiye) यांचे नाव सांगितले. त्यानुसार ते डॉ. उषा गजभिये यांच्याकडे मुलीला घेऊन गेले. डॉ. उषा गजभिये यांनी बालिकेच्या पोटाला हात लावताच पोटात गोळा असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी सदर मुलगी काही खात होती काय असे विचारले असता तिच्या पालकांनी तिच्या जिभेवर अनेकदा केस दिसून आले असल्याचे सांगितले.
त्यामुळे सदर मुलगी केस खात असावी या निष्कर्षापर्यंत डॉ. उषा गजभिये (Dr. Usha Gajbhiye) पोहोचल्या. डॉक्टर गजभिये यांनी तिच्या विविध तपासण्या केल्या त्यामध्ये तिच्या जठरामध्ये अन्नाच्या पिशवीमध्ये गोळा असल्याचे दिसून आले. आणि तो छोट्या आतडीत सुद्धा जात असून गोळा काढणे आवश्यक असल्याचे पालकांना सांगितले. पालकांनी ऑपरेशनला होकार देताच (Amravati Hospital Surgery) डॉक्टरांनी मुलीच्या पोटातील गोळा काढण्याचे ठरविले. त्यानुसार डॉक्टर उषा गजभिये यांनी मुलीचे ऑपरेशन केले.
जठर स्टमक जवळपास पंधरा-सोळा सेंटिमीटर च्या लांबीने उघडून तिच्या पोटातील अर्धा किलो केसाचा गोळा बाहेर काढला. हा गोळा पूर्णतः जठराच्या आकाराचा होता. या जटील शस्त्रक्रियेमुळे जवळपास सात दिवस मुलीला अन्न आणि पाणी काहीही घेता आले नाही. सध्या बालिकेची प्रकृती उत्तम आहे. डॉ. उषा गजभिये (Dr. Usha Gajbhiye) यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून मुलीला जीवदान दिल्याबद्दल (Amravati Hospital Surgery) पालकांनी साक्षात डॉक्टर उषा गजभिये आमच्या मुली करिता देवदूत ठरल्या असल्याचे सांगितले. या शस्त्रक्रियेत डॉ. गजभिये यांना डॉ. जयेश इंगळे यांचे सहकार्य लाभले.
सदरची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत डॉक्टर गजभिये (Dr. Usha Gajbhiye) यांच्या हॉस्पिटलमध्ये निशुल्क करण्यात आली. डॉक्टर उषा गजभिये यांनी या अगोदर सुद्धा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका अकरा वर्षाच्या मुलीच्या पोटातून या पेक्षाही मोठा गोळा काढला होता. तसेच एका तीन दिवसाच्या नवजात बालकाच्या पोटातूंन दोन मृत अर्भके काढण्याची अत्यंत जटील शस्त्रक्रिया केली होती.
थोडीफार मानसिक दुर्बल बालके कपड्यांचे तुकडे खाणे, केस खाणे, माती खाणे असे प्रकार करतात. ह्या वस्तू पोटात गेल्यानंतर अण्णाच्या पिशवी मध्ये असलेल्या ऍसिड ने सुद्धा त्या विरघळत नाहीत. किंवा कोणत्याच पाचक रसाने पचत नाहीत. त्या पोटात जमा होतात. त्यानंतर काही वर्षांनी पोटाच्या जठराच्या आकाराचा गोळा तयार होतो. मुलं अशी काही वस्तू खात असतील तर त्यांच्याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे..
– डॉ. उषा गजभिये, मातृछाया हॉस्पिटल अमरावती.




