परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपाचारा दरम्यान घेतला आखेरचा श्वास!
परभणी (Drowned) : परभणीच्या जिंतूर तालुक्यात तलावात कपडे धुण्यासाठी गेल्यावर बुडालेल्या दोन बहिणींपैकी एकीचा गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. तर दुसर्या बहिणीवर परभणीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. या बहिणीचाही ३१ ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. घटनेतील दोन्ही बहिणी मयत झाल्या आहेत.
जिंतूर तालुक्यातील कुर्हाडी शिवारात गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेल्या पुजा परमेश्वर चव्हाण वय २० वर्ष,संध्या परमेश्वर चव्हाण वय १७ वर्ष या दोन्ही बहिणी तलावात बुडाल्या होत्या. शोध मोहिमे नंतर पुजा चव्हाण मिळुन आली. तीला सुरुवातीला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान पुजा परमेश्वर चव्हाण हिचा ही मृत्यू झाला. तर संध्या चव्हाण ही गुरुवारीच मयत झाली होती. याप्रकरणी बामणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेका सुभाष चव्हाण करत आहेत.




