३८ बॉटल जप्त, जिल्ह्यात औषध विक्री दुकानांची तपासणी
भंडारा (Drug Shop Inspection) : कोल्डिफ कफ सायरपच्या सेवनामुळे मध्यप्रदेशातील २० बालकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील औषध प्रशासन विभागाने औषध दुकानांची तपासणी सुरू केली आहे. यादरम्यान (Drug Shop Inspection) डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणार्या तीन दुकानांवर कारवाई करण्यात आली असून ३८ बॉटल स्टॉक सील करण्यात आले आहे.
घातक रसायनांमुळे मध्यप्रदेश तसेच राजस्थानातील एकूण २२ बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली होती. तामिळनाडूतील स्त्रेसन फार्माक्युटिकल्सने (Drug Shop Inspection) कोल्डिफ कफ सायरप तयार केले होते. या सायरपच्या सेवनाने अत्यवस्थ झालेल्या मध्यप्रदेशातील पाच बालकांना नागपुरातील रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील एका बालकाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रासह काही राज्यांनी या औषधांचा पुरवठा, विक्री तसेच वापरावर बंदी घातली आहे. तसेच तामिळनाडू सरकारने कोल्डिफ कफ सायरप तयार करणार्या कंपनीला टाळे ठोकल्याची माहिती आहे.
केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार कफ सायरप िंकवा कोणत्याही मिश्रणाचा ४ वर्षाखाली बालकांसाठी वापर करू नये असे नमूद करण्यात आले असताना मध्यप्रदेश व राजस्थानमधील (Drug Shop Inspection) कोल्डिफ कफ सायरपच्या सेवनामुळे अनेक बालकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात देखील घातक रसायन मिश्रीत सायरपवर प्रतिबंध करण्यात आले. भंडारा जिल्ह्यात देखील औषध दुकानांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
तपासणीदरम्यान कोल्डिफ कफ सायरपचा साठा भंडारा जिल्ह्यात आढळून आला नाही. परंतु रिस्पायरेश टी.आर. बी.नं.आर.०१ जीएल २५२३चे ३८ बॉटल स्टॉक आढळून आला असून तो संपूर्ण स्टॉक प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. तसेच शासकीय रुग्णालयाचे ड्रग स्टोअर्स व इतर किरकोळ व घाऊक विक्रेताकडून चाचणीसाठी दोन-दोन कफ सायरपचे नमुने घेण्यात आलेले आहेत.
औषध दुकानांमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मोहीम राबविण्यात आली असून, ज्या औषध दुकानांमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सायरप विक्री करण्यात आली, अशा तीन औषध दुकानांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त, औषध प्रशासन भंडारा शहनाज ताजी यांनी दिली आहे.