Yawatmal crime :- शहरात देशातील दुसर्या क्रमांकाच्या दुर्गा उत्सवाची (Durgautsav)नुकतीच भक्तीभावाने सांगता झाली आहे तर दुसरीकडे दुर्गा उत्सवाच्या निमित्तानेच शहरातील काही दुर्गा उत्सव मंडळाच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर जुगार भरवून करोडो रुपयांच्या जुगार (Gambling) खेळवून मोठी आर्थिक उलाढाल केली या उलाढालीत काही मंडाळाने मोठी आर्थिक रक्कम जमा करून आपला नवरात्र उत्सवाचा खर्च भागविला आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष चर्चेचा विषय
नवरात्र उत्सव म्हणजे शहरातील अद्वितीय पर्वच परंतु या पवित्र सोहळ्यातूनही दोन नंबरच्या कमाईचे साधन काही दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने शोधून मंडपाच्या मागेच जुगार अड्ड्याची निर्मीती केली गेली नवरात्र उत्सव साजरा होण्याच्या आधीपासून शहरातील काही दुर्गा उत्सव मंडळात जुगार अड्डे सुरू करण्यात आले होते. या जुगार अड्ड्यावर कुणाची नजर पडून नये यासाठी मंडळाच्या वतीने आधीच मोठ्या आर्थिक रक्कमेची तजवीज करून थोडं दुर्लक्ष करा अशी विनंती केली होती . त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणून शहरातील नवरात्रातील काही मंडळाचे जुगार अड्डे करोडोंच्या घरात गेले. मोठे पाठबळ असल्याने काही मंडळींच्या जुगार अड्ड्यावर दिवस रात्र जुगार सुरू होता. पोलिसांनीही अशा जुगार अड्ड्यावर केलेले दुर्लक्ष शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. या जुगारात शहरातील हायप्रोफाइल(High profile) नागरिकांचा समावेश होता. हे सर्व गुपीत उघडपणे रात्रंदिवस ९ ते १० दिवस तर काही मंडळांने उशीरा मिळालेली परवानगी जुगार अड्डे सूरू होते, मात्र कारवाई कुठे दिसली नाही.