चिखली (Buldhana) :- मागील वर्षी झेंडूच्या फुलांला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे यावर्षी झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी कमी प्रमाणावर झेंडूची लागवड केली होती. मात्र यंदा नवरात्र उत्सवात आणि दसरा सणाला फुलांच्या भावात वाढ झाल्याने मेरा बु येथील शेतकरी मोहन पडघान यांनी १० गुंठ्यांत २ लाखाचे झेंडूचे उत्पन्न घेतले. त्यामुळे यावर्षी झेंडू उत्पादक शेतकऱ्यांलां दसरा चांगलाच पावला असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
१० गुंठ्यांत २ लाखाचे उत्पन्न
चिखली तालुक्यातील मेरा बु येथील चेके कुंटूब तसेच गावातील इतरही शेतकरी(Farmer) अनेक वर्षांपासून झेंडूची लागवड करून दसरा आणि दिवाळी या दोन्ही सणामध्ये झेंडूचे फुले गाड्या मध्ये भरून बाहेर जिल्ह्यात नेवून चांगल्या भावाने विक्री करतात त्यातून लाखों रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने त्यांची दसरा व दिवाळी हे सण आंनदांत साजरे होतात. परंतु मागील वर्षी झेंडूच्या फुलांला बाजारात कवडी मोल भाव मिळाला तर काही शेतकऱ्याकडून फुले गुजरात ठिकाणी नेवूनही फुले घेतलीच नसल्याने भरलेल्या गाड्यातील फुले रस्त्यावर फेकून द्यावी लागली होती. त्यात पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान आणि वाहतूकीच्या दळणवळनाचा खर्च परवडत नसल्याने खर्चही निघत नाही त्यामुळे यावर्षी चेके कुंटूबांनी झेंडूची लागवड केलीच नाही आणि मोचक्याच शेतकऱ्यांनी लागवड केली होती त्यामध्ये मोहन अंबादास पडघान यांनी त्यांच्या शेतात १० गुंठ्या मध्ये झेंडूची लागवड केली आणि नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वीच झेंडूच्या फुलांची मागणी वाढली. आणि दसरा या दिवशी ५० ते १०० प्रतिकिलो रुपयांनी फुले विकली गेली आहे त्यामध्ये मोहन पडघान यांनी १० गुंठ्यांत चक्क दोन लाखाचे उत्पन्न मिळविले असून आता दिवाळी सणाला ही दोन लाखाचे उत्पन्न होईल असे दै देशोन्नतीलां (Deshonnati) सांगण्यात आले .




