जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहरातून जुलूस
परभणी (Eid-e-Miladunnabi) : शहरातून शुक्रवारी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांनी मोठा जुलूस काढला. यात हजारोंच्या संख्येने बांधव सहभागी झाले होते. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षीचा हा जुलूस लक्षवेधी ठरला. दुपारी 3 वाजता परभणी शहराच्या ग्रँड काँर्नर येथुल ईद-ए-मिलादुन्नबी (Eid-e-Miladunnabi) जुलस काढण्यात आला शहराच्या विविध भागातून मुस्लिम समाजातील धर्मगुरू जेष्ठ व लहान मुलं आदींचा मोठ्या प्रमाणात जुलसात पायी चलनात सहभाग होता. तसेच शहरातील विविध पक्षाचे मुस्लिम समाजचे नेते मंडळी उपस्थित होते.
सदरील जुलूस परभणीतील ग्रँड कॉर्नर पासून सुरुवात झाली ,आझाद चौक शाही मस्जिद , स्टेडियम नारायण चाळ, आर आर टावर ,मुल्ला मस्जिद, गांधी पार्क गुजरी बाजार, शिवाजी चौक नटराज ,कॉर्नर सुभाष कॉर्नर जिल्हा सामान्य रुग्णालय समोरून सायंकाळी मुख्य इदगाह येथे मैदान येथे नमाज पठान करून शांततेने निघालेल्या जुलसाची सांगता झाली. सदरील जुलुसात तीन ते चार हजार नागरिकांनी हागरी लावली. (Eid-e-Miladunnabi) जुलुसाचा गांभीर्य घेऊन परभणी पोलीस जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाने जागोजागी चौक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.




 
			 
		

