उमरखेड (Yawatmal) :- ८ जून रोजी पोलीस स्टेशन उमरखेड हददीत फिर्यादी शेख आरीफ शेख निसार (२४) रा. आठवडी बाजार उमरखेड यांस व त्याच्या भावास यांतील आरोपी शेख तैमीर शेख समीर, मुजू शहा जावेद शहा त्याचे इतर ८ ते १० साथीदार यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून हातात तलवार, लाठीकाठी घेवून लवारीने व काठीने मारुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला त्यावरून परस्पर विरोधी उमरखेड पोलीस स्टेशन (Police station) मध्ये कलम १०३ (१) १८९ (२), १८९(४), १९१(२), १९१ (३), १९० भान्यांस व कलम १३५ मपोका सह कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पैंकी अप क्रमांक ४४४/२०२५ कलम १०९, १८९(२), १८९(४), १९१ (२), १९१ (३), १९० भान्यांस व कलम १३५ मपोका सह कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये दिनांक १५/०६/२०२५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
शाखा यवतमाळ व पोलीस स्टेशन उमरखेड यांची संयुक्तीक कारवाई
सदर गुन्हयांचे गांभीर्य ओळखून व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा यवतमाळ व पोलीस निरीक्षक उमरखेड यांना दोन टीम तयार करून सदर गुन्हयातील आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदर गुन्हयातील आरोपींची दोंन्ही टीम वेगवेगळया ठिकाणी शोध घेत होत्या. त्याप्रमाणे १७ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद व पोलीस स्टेशन उमरखेड डीबी पथक असे सयुक्तीकरित्या आरोपी शोध घेत असतांना यांतील आरोपी परवेज खान सलीम खान (लाला), शेख तैमीर ऊर्फ समीर शेख, शेख आझीम ऊर्फ इचोडा शेख पाशा, शेख ईब्राहीम ऊर्फ इरफान शेख पाशु, शेख मुजाहीद ऊर्फ मुज्जू शहा जावेद अली शहा, सयद आरीफ सयद युसूफ, एफौज्जोदीन ऊर्फ गौसू मुज्जोदीन काझी असे नागपूर- नांदेड हायवे रोड ढाणकी कडे जाणार्या ब्रिज खाली थांबले असल्याबाबत गोपनिय माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी दोन्ही टिमने जावून पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने सापळा लावून यशस्वी सापळा कारवाई करून एकूण ०७ आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी ८) शेख मोबीन ऊर्फ मुन्ना शेख रऊफ यांस त्याचे राहत्या घरातून ताब्यात घेतले. अशा प्रकारे सर्व आरोपींना सदर गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.
सर्व आरोपींना सदर गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले
तरी सदर गुन्हयातील नमूद आरोपी परवेज खान सलीम खान (लाला) (३४), शेख तैमीर ऊर्फ समीर शेख (२०), दोन्ही रा. आठवडी बाजार उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ, शेख आझीम ऊर्फ इचोडा शेख पाशा (२४) रा. हदगांव ता.हदगांव जि.यवतमाळ, शेख मोबीन ऊर्फ मुन्ना शेख रऊफ (२५) रा. जामा मस्जीद जवळ उमरखेड, शेख मुजाहीद ऊर्फ मुज्जू शहा जावेद अली शहा (२७) रा. उमरखेड, सयद आरीफ सयद युसूफ (२२) रा. उमरखेड, एफौज्जोदीन ऊर्फ गौसू मुज्जोदीन काझी (२५) रा. सुक्ळी ता. उमरखेड, शेख मोबीन ऊर्फ मुन्ना शेख रऊफ (२५) रा. जामामस्जिद उमरखेड ता. उमरखेड जि.यवतमाळ यांना नमूद पथकांनी संयुक्तीरित्या पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप (म.पो.से) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ पोलीस स्टेशन उमरखेड यांचे मार्गदर्शनात स. पो. नि. धिरज बांडे, स.पो.नि.निलेश सरदार, पोउपनि शरद लोहकरे, पोउनि सागर इंगळे, पोहवा मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोशि राजेध जाधव सर्व नेम – स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच उमरखेड पोलीस स्टेशन पोहवा मधुकर पवार, पोशि संगशिल टेंभरे, पोशि प्रफूल घुसे, पोशि निवत्ती महाळनर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.