Risod :- सायकल स्वाराचे नियंत्रण सुटल्याने सायकलसह नाल्यात पडून एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक २२ जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथे घडली. इस्माईल खा हाफिज खान पठाण वय ६५ वर्षे राहणार गोभणी तालुका रिसोड असे मृतकाचे नाव असून गोभणी येथून शिरपूर कडे सदर व्यक्ती जात असल्याची माहिती मिळाली आहे.
नाल्यात पडून एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रिसोड तालुक्यातील गोभणी येथील रहिवासी इस्माईल खा हाफिज खान पठाण हे गोभणी येथील मशिदीमध्ये इमाम म्हणून नमाज प’ण करवायाचे काम करत होते. दिनांक २२ जून रोजी सकाळी ते आपल्या सायकलने गोभणी वरून शिरपूरला जाण्याकरिता निघाले असता सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान गोवर्धन येथील वळणावर नाला व त्यातच मोठा उतार असल्याने त्यांचे सायकल वरचे नियंत्रण सुटले व इस्माईल खा पठाण हे सायकल सह नाल्यात पडले. गोवर्धन येथील स्थानिक नागरिकांनी त्यांना आरडा ओरड करून यादरम्यान थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. नाल्यात पडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन इस्माईल का पठाण यांना गोवर्धन येथील एका खाजगी रुग्णालयात (Private hospitals) भरती केले.
मात्र रक्तस्त्राव (Bleeding)अधिक झाल्याने व मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.? ऍम्ब्युलन्सने इस्माईल खान यांचा मृतदेह (dead body) त्यांचे मूळ गाव गोभणी येथे पा’वण्यात आला व संध्याकाळी सहा वाजता त्यांचा गोभणी येथील कब्रस्तान मध्ये अंत्यविधी पार पडला.