मृतक व जखमी सक्खे भाऊ
मोहगावदेवी येथील घटना
भंडारा (Electric Shock Death) : मोहाडी तालुक्यातील मोहगावदेवी येथे दि.९ जुलै रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान दुर्दैवी व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरच्या नळाची मोटारपंप सुरु करण्यास गेलेल्या दोघा भावाला विद्युत धक्का बसला. (Electric Shock Death) एका भावाने दुसर्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचाच दुर्दैवी बळी गेला. नंदकिशोर साखरवाडे, असे मृतकाचे तर रविचंद्र साखरवाडे, असे जखमीचे नाव आहे.
मोहगावदेवी येथील नंदकिशोर साखरवाडे व रविचंद्र हे सक्खे भाऊ असून घटनेच्यावेळी घरच्या नळाचा मोटारपंप सुरु करण्यासाठी दोघेही गेले होते. त्यावेळी मोटारपंपचा विद्युत करंट रविचंद्र याला लागल्याने तो जखमी झाला. तेव्हा जवळच असलेल्या भाऊ नंदकिशोर याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यालाच जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जमिनीवर कोसळला. जखमी दोघाही भावांना उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी नंदकिशोर साखरवाडे याला (Electric Shock Death) मृत घोषित केले. घटनेची नोंद वरठी पोलिसात केली आहे.