Vairagad :- येथे २८ ऑगस्टच्या मध्यरात्री वैरागड चुनबोडी कक्ष क्रमांक ३८/४० मधील धान क्षेत्र शेतकर्यांच्या शेतातून रानटी टस्कर हत्तींच्या (Elephants) कळपाने हाहाकार माजवून अनेक शेतकर्यांच्या शेतातील उभ्या धान पिकांचे नुकसान केले आहे.
कार्यालयजवळ तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
तीन वर्षापासून रानटी टस्कर हत्तींचा कळप वैरागड आणि परिसरात हाहाकार माजवून शेतकर्यांच्या शेतातील धान पिकांचे नुकसान करीत आहेत. हत्तींचा बंदोबस्त करण्या बाबत वैरागड आणि परिसरातील शेतकर्यांनी शासन आणि वन विभागाच्या (forest department) विरोधात ५ ऑगस्ट रोजी धानोरा-आरमोरी वळणावर महसूल मंडळ कार्यालय जवळ तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आंदोलन मागे घेण्यासाठी वनविभाने दि. ४ ऑगस्ट रोजी वन विभाग कार्यालयात माजी आ. कृष्णा गजबे, वडसा वन विभागाचे उप वन संरक्षक सूर्यवंशी, तहसीलदार चौधरी तसेच वरिष्ठ वन अधिकार्यांच्या उपस्थितीत सभा घेऊन हत्तींचा बडोबस्त करण्यात येण्याची आश्वासन दिले होते. आश्वासनानंतर नुसकानग्रस्त शेतकर्यांनी (Farmers)आंदोलन मागे घेतले. वीस दिवस होतच नाही तर परत वैरागड क्षेत्रातील चुनबोडी परिसरात हत्तींच्या कळपाने हैदोस घालून शेतकर्यांच्या उभ्या धान पिकाचे नुकसान केले. आधीच पेरणीच्या वेळेस हत्तींच्या हौदोसाने कसे–बसे सावरलेले शेतकरी परत धान पिकाची नुकसान झाल्याने पूर्णपणे हवालदिल झाला आहे. रानटी हत्तींचा बंदोबस्त केला नाही तर आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकर्यांनी दिला आहे.
रानटी टस्कर हत्तींचा कळप कराडी–सालमारा मार्गे मार्गक्रमण करीत वैरागड येथील चुनबोडी शेत शिवारातून सालमारा एफ. डी. सी. एम. कक्ष क्रमांक ३७ मध्ये वास्तव्यास आहे. परत ते रात्री याच परिसरातून मार्गक्रमण करून शेत पिकाचे नुकसान होऊ शकते शेतकर्यांनी सतर्क रहावे असे आवाहन वैरागडचे वनरक्षक के. के. बिस्वास यांनी केले आहे.