कार्यरत कलावंतांना डावलून बोगस कलावंतांचा भरणा करण्यात आल्याने कलावंतांत नाराजीचा सुर
देसाईगंज (Artist selection Samiti) : वयाची ५० शी पार करून शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अटी-शर्थी पुर्ण करणार्या कलावंतांना ५ हजार रुपये प्रती महिणा मानधन देण्यात येत आहे.पात्र कलावंतांची निवड करण्याकरीता जिल्हा स्तरावर कलावंत निवड समितीचे (Artist selection Samiti) गठण करण्यात आले आहे.मात्र गठित करण्यात आलेल्या निवड समितीत कला क्षेत्राशी निगडित ३ कलावंत सोडून बोगस कलावंतांचा भरणा करण्यात आल्याने कार्यरत कलावंतांना डावलून बोगस कलावंतांचा शिरकाव करण्यात आल्याने याबाबत कलावंतांत नाराजीचा सुर उमटू लागला असून बोगस कलावंतांना काढुन टाकण्यासाठी लवकरच कलावंतांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती झाडिपट्टी रंगभूमीत अनेक वर्ष खपलेल्या कलावंतांकडून देण्यात आली आहे.
एकट्या देसाईगंज तालुक्यात कार्यरत दोन एजंटांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले विविध संघटनांचे प्रमाणपत्र देऊन मोठ्या प्रमाणात बोगस कलावंत तयार करून त्यांचेकडून प्रत्येकी १० हजार रुपये उखळुन मानधन योजना लागु होण्यात मौलिक भुमिका बजावली आहे.यात देसाईगंज तालुक्यातील नैनपुर येथील व गडचिरोली येथील एका महिलेचा वर्तमान कलावंत निवड समितीत समावेश आहे ज्यांनी की जिल्ह्यातील अनेक गावोगाव फिरून कलावंत मानधन योजनेचे पात्र लाभार्थी बनवून देण्याकरीता प्रत्येकी १० हजार रुपये घेऊन बोगस कलावंतांचा शिरकाव केल्याने विरोधात (Artist selection Samiti) कलावंतांत रोष आहे.
सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या यादितील नावे लक्षात येताच बोगस कलावंतांचा शिरकाव करणार्या तसेच ज्यांचा कलाक्षेत्राशी काडिचाही संबंध नसतांना निवड समितीवर घेण्यात आल्याचे निदर्शनास येताच विरोधात नाराजाचा सुर उमटू लागला आहे.अद्यापही विविध संस्थेचे उपलब्ध असलेले प्रमाणपत्र देऊन बोगस कलावंत तयार करणे सुरुच असल्याचे निदर्शनास आल्याने या विरोधात झाडिपट्टी रंगभूमीत यावर चर्चाही रंगु लागल्या आहेत. तसेच (Artist selection Samiti) निवड समितीवर घेण्यात आलेले सदस्य हे एका विशिष्ट पक्षाचे सदस्य असल्याने कला क्षेत्रातही राजकारणाचा शिरकाव करण्यात आल्याने याप्रती तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान कलावंत निवड समितीवर (Artist selection Samiti) बोगस कलावंतांचा सदस्य म्हणून भरणा करण्यात आल्याने मिळालेल्या संधिचा गैरफायदा घेऊन बोगस लाभार्थी निर्माण करून शासनाची फसवणूक करण्यात येऊ नये करीता झाडिपट्टी रंगभूमीत कार्यरत जेष्ठ कलावंत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे सांगीतले जात आहे.तथापी प्रबोधनकार असलेल्या कला क्षेत्रात चक्क बोगस व बनावटी कलावंतांचा भरणा करण्यात येत असल्याने या गंभीर तेवढ्याच धक्कादायक प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस कलावंतांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.