नियोजन भवनात पार पडला कार्यक्रम
मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षकांना शाल, श्रीफळ, साडीचोळी व प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन केले सन्मानित
शिक्षकांचे आचरण मर्यादापुरुषोत्तमासारखे असावे….
विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांचे प्रतिपादन
विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांचे प्रतिपादन
अमरावती (Ideal Teacher award) : शाळेचा आत्मा शिक्षक असल्याने त्यांचे आचरण खूप महत्तवाचे आहे. त्यांनी मर्यादापुरुषोत्तमसारखे असावे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी यावेळी केले. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. सन २०२४-२०२५ मधील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शानदार वितरण सोहळा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल होत्या. यावेळी जिल्ह्यातील १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे, शिक्षणाधिकारी (योजना) निखिल मानकर, शिक्षणाधिकारी सतिश मुगल, अधिव्याख्याता प्रविण राठोड, गटविकास अधिकारी अभिषेक कसोदे, परीक्षाविधीन उपशिक्षणाधिकारी श्वेता गोळे, प्रेरक उसहारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार साठी वनिता बोरोडे (अमरावती), बबीता पंडित (अचलपूर), सुचिता दहिकर (अंजनगाव सुर्जी), शैलेश मांदळे (भातकुली) सै. रज्जाक से. गफ्फार(चांदूर रेल्वे), इंदिरा रेवस्कर (चिखलदरा), लता गणविर (दर्यापूर), किशोर परतेकी (धामणगाव रेल्वे),स्मिता क्षीरसागर (धारणी), लिलाधर मासोदकर (मोर्शी), इंदिरा नरेंद्र पोटेकर(नांदगाव खंडे), गजानन काकडे (तिवसा), केशव डफरे (वरूड) यांच्यासह कला, क्रीडा, संगीत व दिव्यांग विभागातून विजया सोळंके (विशेष शिक्षिका) यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, साडीचोळी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यादरम्यान, यावेळी निपुण भारत अलेक्झा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमतील विविध विजयी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक पुरस्कार घोषित शिक्षकांचे कुंटूब, शिक्षक संघटना पदाधिकारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी सतिश मुगल यांनी केले. संचालन अजय अडीकणे व प्रतिभा कठोडे यांनी केले. तर आभार प्रविण खांडेकर यांनी मानले. अशी माहिती या कार्यक्रमाच्या प्रसिध्दी समितीचे अजित पाटील, राजेश सावरकर, विनायक लकडे, श्रीनाथ वानखडे, हेमंत यावले यांनी दिली आहे.