जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आदेश
हिंगोली (Hingoli District Crime) : जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्याकरता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी चंग बांधला असताना सतत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या पाच जणांना सहा महिन्यासाठी (Hingoli District Crime) हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले.
या बाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सराईत गुन्हेगार व सतत अवैध धंदे चालविणारे शेख फिरोज शेख अब्दुल रौफ राहणार शहर पेठ वसमत, सय्यद अकबर सय्यद जहागीर राहणार शुक्रवार पेठ वसमत, संदीप माधवराव पालीमकर राहणार शहर पेठ वसमत, रमेश खान रशीद खान पठाण राहणार गणेश पेठ वसमत, अमोल मुंजाजी रोकडे राहणार मंगळवार पेठ वसमत यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे दाखल असून संघटितपणे गुन्हे करीत असल्याने वसमत ग्रामीण ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस एस मुपडे यांनी कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा (Hingoli District Crime) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वसमत यांनी करून या (Hingoli District Crime) पाचही गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याकरता हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे शिफारस केली. या प्रस्तावाची सविस्तर तपासणी करून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पाचही आरोपींना सहा महिन्याकरता हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्या बाबतचे आदेश काढले.