संयुक्त मोहिमेमध्ये बनावट खत साठवणुकीचा पर्दाफाश!
मानोरा (Fake Fertilizer) : तालुक्यातील कारपा येथील शेतकऱ्यांची फसवणूक (Farmers Fraud) रोखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरून प्रभावी कारवाई (Effective Action) करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हा भरारी पथक आणि तालुका भरारी पथकाच्या संयुक्त मोहिमेमध्ये बनावट खत साठवणुकीचा पर्दाफाश (Fertilizer Storage Exposed) करण्यात आला असून, सुमारे 10.5 लाखांचा मुद्देमाल जप्त (Confiscation of Goods) करण्यात आला आहे.
कृषी पर्यवेक्षक आर. व्ही. सवणे आणि इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती!
या कारवाईदरम्यान 600 बॅगा खत आढळून आला. यामध्ये 330 बॅगा नॉन – ब्रँडेड असून, 270 बॅगा ‘कृभको’ कंपनीच्या 10:26:26 ब्रँडच्या पिशव्यांमध्ये भरलेले बनावट खत आढळले. याशिवाय, 158 रिकाम्या खताच्या बॅगा देखील साठवलेल्या अवस्थेत आढळून आल्या. कारवाई दरम्यान, जिल्हा कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगिरीकर, मोहीम अधिकारी गणेश गिरी, तालुका कृषी अधिकारी रोशन भागवत, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण इंगळे, कृषी अधिकारी पंचायत समिती सोपान साळवे, मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, तसेच विभागीय तंत्र अधिकारी (Quality Control) राजेश जानकर मानोरा तालुका कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक आर. व्ही. सवणे आणि इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सदर प्रकरणी खत नियंत्रण आदेश व जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्यात आली आहे. बनावट खत विक्रीमुळे (Selling Fake Fertilizers) शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग (Department of Agriculture) सजग असून, अशा प्रकारच्या कारवायांद्वारे बनावट खत विक्रेत्यांवर वचक बसवण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.