हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची कामगिरी
हिंगोली (Hingoli Crime) : शहरातील आदर्श महाविद्यालय परिसरात हिंगोली शहर डि. बी. च्या पथकाने सोमवारी एका युवकाकडून गावठी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त केले.
हिंगोली शहरातील आंबेडकर नगर भागातील बुध्दभुषण भगवान खिल्लारे याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती (Hingoli Crime) हिंगोली शहर पोलिसांना १९ मे रोजी मिळाली. त्यावरून जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या नेतृत्वात जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, धनंजय क्षीरसागर, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, संतोष करे, अझहर पठाण यांच्या पथकाने सायंकाळी ५.३० च्या सुमारास आदर्श महाविद्यालय रस्त्यावरून जाणार्या बुध्दभुषण खिल्लारेला ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता गावठी बनावट पिस्टल मिळून आले. या (Hingoli Crime) प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अशोक धामणे यांच्या फिर्यादीवरून सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.