नवीन इच्छुकांसाठी संधीचे दरवाजे!
नांदेड (Zilla Parishad) : येणाऱ्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या (Zilla Parishad General Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून काढणारी आणि अनेकांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणारी नांदेड जिल्हा परिषदेच्या ६५ जागेवरील निवडणूक विभागांची आरक्षण (Reservation) सोडत आज सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (District Collector Rahul Kardile) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडली. या सोडतीमुळे अनेक विद्यमान सदस्यांना धक्का बसला असून, नवीन इच्छुकांसाठी संधीचे दरवाजे उघडले गेले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार, नांदेड जिल्हा परिषदेच्या एकूण ६५ जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांनी याबाबतची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
नांदेड जिल्हा परिषदेतील निवडणूक विभागनिहाय आरक्षणाचा (Department Wise Reservation) तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे दिले आहे.
माहूर तालुक्यात
१-वाई बा.- सर्वसाधारण,
२-वानोळा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
किनवट तालुक्यात
३-सारखणी- अनुसूचित जमाती,
४-मांडवी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीा),
५-गोकुंदा- सर्वसाधारण,
६-बोधडी बु.- अनुसूचित जमाती (स्त्रीआ.),
७- जलधारा- अनुसूचित जमाती,
८-इस्लालपूर- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर).
हिमायतनगर तालुक्यात
९-सरसम (बु)- अनुसूचित जमाती (स्त्रीर),
१०-पोटा बु.- सर्वसाधारण (स्त्री्).
हदगाव तालुक्यात
११-निवघा (बा)- अनुसूचित जाती (स्त्रीर),
१२-रूई धा.- सर्वसाधारण (स्त्रीत),
१३-मनाठा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर),
१४-पळसा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
१५-आष्टीा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
१६-तामसा- अनुसूचित जमाती.
अर्धापूर तालुक्यात
१७-लहान- सर्वसाधारण,
१८-मालेगाव- सर्वसाधारण (स्त्री्),
१९-येळेगाव- सर्वसाधारण (स्त्री्).
नांदेड तालुक्यात
२०-वाजेगाव- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर),
२१-वाडी बु.- सर्वसाधारण,
२२-लिंबगाव- अनुसूचित जाती,
२३-धनेगाव- सर्वसाधारण (स्त्री्),
२४-बळीरामपूर- अनुसूचित जाती.
मुदखेड तालुक्यात
२५-बारड- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
२६-मुगट- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
भोकर तालुक्यात
२७-पाळज- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
२८-भोसी- अनुसूचित जमाती (स्त्री्),
२९-पिंपळढव- सर्वसाधारण.
उमरी तालुक्यात
३०-गोरठा- सर्वसाधारण (स्त्रीत),
३१-तळेगांव- अनुसूचित जाती.
धर्माबाद तालुक्यात
३२-करखेली- सर्वसाधारण,
३३-येताळा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
बिलोली तालुक्यात
३४-आरळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
३५-सगरोळी- सर्वसाधारण (स्त्री्),
३६-लोहगांव- सर्वसाधारण,
३७-अटकळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री).
नायगांव (खै.) तालुक्यात
३८-बरबडा- सर्वसाधारण (स्त्री्),
३९-कुंटूर- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर).
४०-मांजरम- अनुसूचित जाती (स्त्रीर),
४१-नरसी- अनुसूचित जाती (स्त्रीत).
लोहा तालुक्यात
४२-सोनखेड- सर्वसाधारण,
४३-वडेपूरी- सर्वसाधारण (स्त्रीत),
४४-उमरा- सर्वसाधारण,
४५-सावरगांव न.- सर्वसाधारण,
४६-कलंबर बु.- सर्वसाधारण (स्त्रीर),
४७-माळाकोळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर).
कंधार तालुक्यात
४८-शिराढोण- सर्वसाधारण,
४९-कौठा- अनुसूचित जाती (स्त्री्),
५०-बहाद्दरपुरा- सर्वसाधारण (स्त्रीर),
५१-फुलवळ- सर्वसाधारण (स्त्रीत),
५२-पेठवडज- सर्वसाधारण,
५३-कुरूळा- सर्वसाधारण.
मुखेड तालुक्यात
५४- जांब बु.- अनुसूचित जाती,
५५- चांडोळा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर),
५६- एकलारा- सर्वसाधारण,
५७-येवती- अनुसूचित जाती,
५८-सावरगाव पि.- अनुसूचित जाती (स्त्रीत),
५९-बा-हाळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रीर),
६०-मुक्रामाबाद- सर्वसाधारण (स्त्री्).
देगलूर तालुक्यात
६१-खानापूर- अनुसूचित जाती (स्त्री्),
६२-शहापूर- अनुसूचित जाती,
६३-करडखेड- अनुसूचित जाती (स्त्री्),
६४-मरखेल- सर्वसाधारण (स्त्रीा),
६५- हाणेगाव- सर्वसाधारण.
या आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाची समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. अनेक ठिकाणी इच्छुकांना आपल्या गटातून किंवा प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी नवा मार्ग शोधावा लागणार आहे, तर काही ठिकाणी महिलांसाठी तसेच आरक्षित प्रवर्गासाठी जागा राखीव झाल्याने त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. आता राजकीय पक्ष या नव्या आरक्षणानुसार आपली रणनिती निश्चित करणार आहेत. पुढील काळात इच्छुकांकडून विविध आरक्षित जागांवरून उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे.