कारवाईची आ. श्रीकांत भारतीयांची मागणी!
अमरावती (Fake Wedding Party) : शंकर नगर मार्गावरील एरिया 91 या रेस्टो बारमध्ये (Resto Bar) दीडशे हुन अधिक अल्पवयीन युवक युतीने फेक वेडिंग पार्टी (Fake Wedding Party) साजरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणात आज आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मुद्दा उपस्थित केला. संबंधितांवर कारवाईची (Action) मागणी त्यांनी.
इंस्टाग्राम व अन्य सोशल मीडियावर फेक वेडिंग पार्टीची जाहिरात!
स्थानिक शंकर नगर येथे बारमध्ये फेक वेडिंग पार्टीचा मुद्दा सध्या सर्वत्र गाजत आहे. याच आठवड्यात या ठिकाणी फेक वेडिंगची पार्टी जल्लोषात साजरी झाली होती. पोलिसांनी छापामार कारवाई करून दीडशेहून अधिक युवती व युवकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. इंस्टाग्राम व अन्य सोशल मीडियावर फेक वेडिंग पार्टीची जाहिरात करण्यात आली होती. युवतींना मोफत प्रवेश तर, युवकांकडून प्रत्यक्ष चारशे रुपये घेण्यात आल्याचे तपासात पुढे आले होते.
अमरावती शहरात ड्रग्स विक्रीचा गोरख धंदा सुरू होण्याची शक्यता!
सदर प्रकरणात आज विधान परिषद (Legislative Council) सदस्य श्रीकांत भारतीय यांनी पॉईंट ऑफ इनफॉर्मेशन द्वारे सभागृहात मुद्दा उपस्थित केला. सदर प्रकार हा अत्यंत बिबस्त् व निंदनीय असल्याचे ते म्हणाले. अशा पार्टीद्वारे अमरावती शहरात ड्रग्स विक्रीचा गोरख धंदा सुरू होण्याची शक्यता देखील आहे. फेक वेडिंग पार्टीच्या माध्यमातून गैरप्रकार देखील होऊ शकतात. मुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सभापती राम शिंदे यांनी यासंदर्भात महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले. पालकमंत्री चंद्रशेखर बवनकुळे (Guardian Minister Chandrasekhar Bawankule) यांनी आपण उद्या शनिवारी स्वतः अमरावतीला जात आहे. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन आपण योग्य कार्यवाही करू असे ते म्हणाले.