जांब परिसरातील प्रकार
शेतकर्यांच्या संकटांची मालिका थांबता थांबेना
जांब (Farm Paddy Damage) : मोहाडी तालुक्यातील जांब येथे यशोदा सीड्स नावाच्या ब्रँडेड कंपनीने शेतकर्यांची फसवणूक केल्याची आढळले. १४५ दिवसांची कालावधी असलेल्या धानाचा निसवा ९० दिवसात झाल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे आढळत आहे. याबाबत कंपनीला कळविले असता. यशोदा सीड्स कंपनीकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे (Farm Paddy Damage) शेतकर्यांना न्याय न मिळाल्यास मोठा आंदोलन छेडू व उपोषणाला बसू असा इशारा जाम परिसरातील शेतकर्यांनी दिला आहे.
शेतकर्यांची उपजीविका असलेला धान पीक हातातून जात असल्याने शेतकर्यांना उपोषण व आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याची ओरड परिसरात होत आहे. यशोदा सीड्स कंपनीने बांधावर येऊन पर्यायी मार्ग शोधावा व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन जांब येथील शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकारी मोहाडी यांना दिला आहे.
हिंगणघाट/वर्धा जिल्ह्यातील यशोदा सीड्स कंपनीने नोवा १४५ धानाची बिजायी शेतकर्यांना उपलब्ध करून देण्याकरिता कृषी केंद्रामध्ये दहा किलो वजनाची बॅग १ हजार १५० रुपयांमध्ये विक्रीस ठेवली होती. मोहाडी तालुक्यातील जांब व कांद्री येथील किमान २० शेतकर्यांनी ३५ ते ४० एकरांमध्ये नोवा १४५ या धानाची पेरणी आपल्या शेतामध्ये केली. मात्र १४५ दिवसाची कालावधी असलेला धरणाच्या ९० दिवसांतच निसवा झाल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
जास्त दिवसांचे भारी वानाचे बिजायी म्हणून विक्री केली असतांना ९० दिवसातच कशी काय फसल उगवली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून यशोदा सीड्स कंपनीने शेतकर्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट दिसत आहे. कमी दिवसात ध्यानाच्या निसवा झाल्याने (Farm Paddy Damage) शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकीकडे पावसाचे थैमान तर दुसरीकडे रानटी प्राणी अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या शेतामध्ये पाणीच पाणी साचून आहे व त्यांचे धान पीक निघण्यास उशीर होत आहे व आनंदाच्या अजूनही निसवा झाला नसल्याने ते ३५ एकरांमध्ये असलेले उत्पन्न यावर धोक्याचे संकट कोसळले आहे. या नुकसान ग्रस्त शेतकर्यांमध्ये जांब येथील मनीष दुर्गे, लक्ष्मण फटिंग, दिनेश लांजेवार, संदीप थोरकर, नरेश काळे, विक्रांत देशमुख, अनिरुद्ध भुजाडे, घनश्याम भुजाडे, घनश्याम वाघमारे, इंद्रकुमार मंडलेकर हे शेतकरी आहेत.
यशोदा सीड्स कंपनीकडून माझी व अनेक शेतकर्यांची फसवणूक (Farm Paddy Damage) झाली आहे. माझ्या शेतातील अर्धा धान निसवला व अर्धा अजूनही निसवायचे आहे. नेमकी कापणे कशी करायची व काय करायचे हे समजेनासे झाले आहे. कृषी अधिकार्यांनी त्वरित कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावे व नुकसान भरपाई करून द्यावी.
-मनीष दुर्गे, शेतकरी, जांब.