Warora suicide case :- तालुक्यातील बांद्रा गावचे शेतकरी उमेश तिमाजी हक्के (५१) यांनी दि. १५ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता जनावरे बांधण्यासाठी गोठ्यात गेले असता तिथे असलेले तणनाशक औषध (Herbicide) प्राशन केले. त्यानंतर त्यांना ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय वरोरा येते नेण्यात आले.
वरोरा तालुक्यातील बांद्रा गावातील घटना
मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय (Hospital)चंद्रपूर येते नेले. मात्र आज दि.१६ सप्टेंबर पहाटे दोन वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचेकडे ४ एकर शेती असून त्यामध्ये सोयाबीन पीक लावले होते. मात्र यावर्षी पावसाने पीक पूर्णपणे भुईसपाट झाल्याने ते आर्थिक विंचनेत होते. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा टेमूर्डा असे एकूण ७७ हजार ५९० रुपये कर्ज होते. या वर्षी पीक खराब झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे समजते. त्यांच्या मागे दोन मुले दोन सुना नातू आई असा परिवार आहे.