अकोला मुकिंदपूर शेत शिवारातील घटना
नेर (Farmer death Case) : तालुक्यातील मुंकिदपूर शेतशिवारात एका शेतकर्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अजय नारायणराव दरोई (५०) असे मृत शेतकर्याचे नाव असून, त्यांचा मृतदेह आज दुपारी सुमारे ४ वाजता त्यांच्या शेतात आढळून आला.
अजय दरोई हे नेर येथील शिवाजीनगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. दररोजप्रमाणे ते शनिवारी सकाळी ९ वाजता दुचाकीने आपल्या शेतात झाडाझुडपं तोडण्यासाठी गेले होते. मात्र, दुपार उलटून गेली तरीही ते घरी परतले नाहीत. यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने चिंता वाढली. त्यांनी तात्काळ ही माहिती नातेवाईकांना दिली. (Farmer death Case) नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, अजय दरोई यांचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह जवळ कोणतेही संशयास्पद वस्तू सापडल्या नसून, प्रकरण अत्यंत गूढ असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृतक अजय दरोई यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. नेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रोहित ओव्हाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, (Farmer death Case) मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना नैसर्गिक मृत्यू आहे की अन्य कोणतीही बाब यामागे आहे, याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे.




