नागभीड (Farmer Death) : सर्पदंशाने शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना वासाळा मेंढा येथे घडली. मृत शेतकर्याचे नाव तुळशीदास सुखरू टेकाम (५३) असे आहे. मिळालेल्या माहिती नुसार तुळशीदास सोमवारी रात्री घरी झोपला होता. (Farmer Death) रात्री तीन वाजताच्या दरम्यान विषारी सापाने तुळशीदासला दंश केला.
ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला मंगळवारी पहाटे उपचारासाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. (Farmer Death) मंगळवारी चंद्रपूरला नेत असताना मूलजवळ तुळशीदासचा मृत्यू झाला.