पाऊले चालती पंढरीची वाट..
राजेंद्र काळे
Farmer Debt Relief: आषाढी वारीसाठी दिंड्यांचं प्रस्थान हळूहळू सुरु झालंय. संतनगरी शेगाववरुन श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं, अध्यात्मीक उत्साहात.. शेती ही पंढरी, तर शेतकरी हे वारकरी.. पेरलेल्या एका दाण्यातून उगवलेल्या प्रत्येक कणसात कमरेवर हात ठेवून उभा पांडूरंग दिसावा, इतकी भक्ती कृषी संस्कृतीत असते. पण या जगाच्या पोशिंद्याचे काय हाल सध्या सुरु आहे? याकडे मात्र सरकारचे लक्ष नाही. प्रत्येक नेत्याच्या फोटोच्या खाली ‘माझा पांडूरंग’ लिहण्याचं पॉलिटीकल फॅड आलंय, एवढी कार्यकर्त्यांची नेत्यांवर ‘भक्ती’.. पण हेच नेते त्यांची ‘शक्ती’ खरंच या शेतकरी कार्यकर्त्यांसाठी कितपत वापरतात? हे बिचारा तो पांडूरंगच जाणे!
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफीचे (Farmer Debt Relief) आश्वासन विधानसभेच्या प्रचारात देवून सत्तेवर आलेलं महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारचे खजीनदार अर्थात अर्थमंत्री अजीतदादा पवार यांनी कर्जमाफीचे असे कोणतेही आश्वासन आपण दिले नसल्याचे सांगून उलटी पलटी मारली.. केंद्राप्रमाणे राज्याचा हाही ‘चुनावी जुमला’ ठरला. दादांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रियांची वावटळ उठली, पण याचे वादळ बनविले ते शेतकरी नेते (Prakash Pohare) प्रकाशभाऊ पोहरे यांच्या नेतृत्वाखाली ‘किसान ब्रिगेड’ या आक्रमक शेतकरी संघटनेने. जहाल प्रतिक्रिया अन् आंदोलनात्मक पवित्रा दिसला (Kisan Brigade) किसान ब्रिगेडचा. आतातर किसान ब्रिगेडने कर्जमुक्तीसाठी (Farmer Debt Relief) प्रशासनाकडे कर्जमुक्तीचे फार्म सादर करुन त्यावर न्यायालयीन लढा उभारण्याचे आंदोलन व्यापक स्वरुपात केले असून, सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत जात-धर्म-पक्ष-संघटना-झेंडा विसरुन शेतकर्यांसाठी एकत्र येऊयात.. असा नाराच दिला आहे.
अर्ज करुन कर्जमुक्ती मागेल त्यालाच (Farmer Debt Relief) कर्जमुक्ती, या ‘किसान ब्रिगेड’च्या अभियानांतर्गत आतापर्यंत २ टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येनी कर्जमुक्तीचे अर्ज प्रशासनाकडे दाखल होत आहे. आता अंतिम टप्पा क्र.३ साठी १९ जूनपर्यंत कधीही अर्ज दाखल करा, असे राज्य कार्यकारणी सदस्य दिवाकर गावंडे व शरद वानखेडे यांनी आवाहन केले असून.. किसान ब्रिगेडची (Kisan Brigade) संघटनात्मक बांधणीही त्यांनी गाव, तालुका व जिल्हा पातळीवर जोरात सुरु केली आहे. कर्जमुक्त्ती अर्जाच्या याद्या बनवून जनहित याचिका (Kisan Brigade) किसान ब्रिगेडच्या माध्यमातून सादर केली जाणार आहे
अस्मानी संकट व सुलतानी प्रकोपामुळे शेतीची दुरावस्था झाली असून पडलेल्या शेतमालाच्या किंमती व शेतकर्यांवर मोठ्या प्रमाणात थकीत झालेले बँकांचे कर्ज, यामुळेच शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहे. सरकार ‘धीर’ देण्याऐवजी ‘अधीर’पणे काहीही वक्तव्ये करत आहे. शेतकर्यांच्या संघटना राजकारणाच्या वाट्याला गेल्याने, आता शेतकर्यांसाठी निरपेक्ष लढणारी ‘किसान ब्रिगेड’ (Kisan Brigade) हीच शेतकर्यांची एकमेव आशा उरली आहे. अंगावर आलेल्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेला शिंगावर घेण्याची ताकद ‘प्रकाश पोहरे’ (Prakash Pohare) या नावात आहे. त्यामुळे प्रकाशभाऊंवर विश्वास ठेवून आतापर्यंत राज्याच्या विविध भागातून ४ लाखांच्यावर शेतकर्यांनी शासनाकडे अर्ज सादर केल्याची माहिती मिळाली आहे.
किसान ब्रिगेडच्या (Kisan Brigade) कर्जमुक्ती अभियानांतर्गत (Farmer Debt Relief) बुलढाणा जिल्ह्यात बुधवार ४ जून रोजी खामगाव, मलकापूर व बुलढाणा येथे किसान ब्रिगेडच्या महत्वपुर्ण बैठका पार पडल्या. आंदोलन, कर्जमुक्ती, नियोजन.. या माध्यमातून न्यायालयीन जनहित याचिकेकरीता ‘एक दिवस शेतकर्यांसाठी..’ हा स्लोगन या बैठकीचा होता. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, प्रकाशभाऊ अन् त्यांच्या सहकार्यांचे संबोधन शेतकर्यांसाठी नवसंजीवनी देत लढ्याची प्रेरणा देवून गेले. यातून जाणवले ते, (Kisan Brigade) ‘किसान ब्रिगेड’चे.. पाऊल कर्जमुक्तीकडे!