हिंगोली (Farmer suicide Case) : सेनगाव तालुक्यातील रेपा येथील शेतकर्याला बँकेने पिककर्ज नाकारल्याने त्याने विषारी औषध प्राशन केले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील रेपा येथील प्रसाद करे यांच्याकडे सामाईक क्षेत्रातील सहा एकर शेत जमीन असून त्यावर त्यावर त्याच्या वडीलांनी ६५ हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. या (Farmer suicide Case) कर्जाचा बोजा सातबारावर चढविण्यात आला होता. कालांतराने सामाईक क्षेत्रातील शेतीच्या वाटण्या झाल्याने त्यातील दोन एकर शेत जमीन प्रसाद करे याच्या हिश्याला आला होती. यंदाच्या खरीप हंगाम पेरणीसाठी पुसेगाव शाखेच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह इतर बँकाकडे त्यांनी कर्जाची मागणी केली होती.
परंतु प्रसादच्या वडीलांच्या नावे कर्ज असल्याने बँकानी कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे खरीप हंगाम हातातून जावू नये या उद्देशाने प्रसादने इकडून तिकडून उधारीने रक्कम घेवून कशीबशी पेरणी पुर्ण केली. शेतातील पिक समाधान कारक असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. बँकेने कर्ज दिले नसल्याने उधारीवर आणलेले पैसे कसे फेडावे तसेच कुटूंबाची उपजिवीका कशी भागवावी हा प्रश्न त्याच्या समोर उभा ठाकला होता. याच चिंतेमध्ये ११ सप्टेंबर गुुरुवार रोजी गावालगत असलेल्या शेतातील झाडाखाली बसून प्रसादने विषारी औषध प्राशन केले होते.
ही बाब काहींच्या लक्षात आल्याने त्यांना तात्काळ छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रसादचा मृत्यू झाला. या (Farmer suicide Case) प्रकरणी मयताची पत्नी शोभा करे हिने सेनगाव पोलिस ठाण्यात २० सप्टेंबरला दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यू नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक मस्के, जमादार जीवन मस्के, किशोर कातकडे, सुभाष चव्हाण हे करीत आहेत.