लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील घटना
बारव्हा (Farmer suicide Case) : अल्पभूधारक असलेल्या एका शेतकऱ्याने यंदाच्या खरीप हंगामात शेत शिवारात विविध पीक लागवडीसाठी विविध बँकांसह खाजगी कर्जाची उचला केली होती. मात्र लागवडीखालील पिकातून कर्जाची परतफेड होऊ शकत नसल्याने तणावग्रस्त (Farmer suicide Case) शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना उघडकीस आली.
संबंधिताला तात्काळ उपचारासाठी लाखांदूर येथील (Bhandara Hospital) ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. ही (Farmer suicide Case) घटना २२ मार्च रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. बाळकृष्ण आत्माराम अलोने (६५) रा सोनी असे घटनेतील मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
सविस्तर असे की, घटनेतील मृतक बाळकृष्ण अलोणे यांची सोनी शेत शिवारात जवळपास २ एकर शेतजमीन आहे. यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी मालकीचे शिवारात धान पिकाची लागवड केली होती. ही (Farmer suicide Case) लागवड करण्यासाठी त्यांनी विविध बँकांसह खाजगी नागरिकांकडून कर्जाची उचल केली होती. या रकमेतून त्यांनी मालकी शेत शिवारात धान लागवडीसह खते व विविध कीटकनाशकांची फवारणी केली.
दरम्यान, खरिपात लागवडीखालील पिकांची कर्ज काढलेल्या रकमेतून संगोपन करून देखील योग्य त्या प्रमाणात उत्पादन न झाल्याने तो मागील काही दिवसांपासून चिंताग्रस्त दिसत होता. कर्जाची परतफेड कशी करावी. या विवंचनेतुनच त्याने २१ मार्च रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास विष प्राशन केले. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला उपचारासाठी लाखांदूर येथील (Bhandara Hospital) ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
लाखांदूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केला मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. भंडारा येथील (Bhandara Hospital) रुग्णालयात २२ मार्च रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.