शेतकर्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्या
परभणी (Farmers Andolan) : जालना-नांदेड समृध्दी महामार्गासाठी विविध विभागाने मिळून संयुक्त मोजणी केली आहे. मोजणी प्रमाणे झालेले मुल्यांकन ग्राह्य धरुन मोबदला द्यावा, या मागणीसाठी गुरुवार २२ ऑगस्ट रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (Farmers Andolan) करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला जोडेमारुन निषेध नोंदविला.
शासनातील विविध नोंद विभागांनी मिळून संयुक्त मोजणी केली. त्यानंतर चावडी वाचन करण्यात आले. भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी आदेश काढून प्रत्येक घटकाचे मुल्यांकन ठरवून सादर केले आहे. हे ग्राह्य धरुन त्यानुसार मोबदला देण्यात यावा अन्यथा बाधित शेतकरी आपल्या शेतात आत्महत्या, आत्मदहना सारखे आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. या (Farmers Andolan) बाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर कालिदास आपेट, महादेव पवार, दिगंबर पिंपळे, बाळासाहेब गोडकर, विष्णू इक्कर, मदन जाधव, विठ्ठल जावळे, हरिभाऊ इक्कर, परमेश्वर इक्कर, गणेशराव देशमुख, रामप्रसाद देशमुख, रामकिशन भाबट, बाळासाहेब जाधव, नवनाथ भोरे, सुरेश मानमोडे, विजय खरात, दत्ता भुजबळ, बालासाहेब खरात, मुंजा गोरे, उध्दवराव जावळे, बालासाहेब जावळे, रखमाजी इक्कर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.