मानोरा (Washim) :- किसान ब्रिगेडच्या वतीने कर्जमुक्तीचे अर्ज दि. १४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकडो शेतकऱ्यांनी तहसीलदार डॉ. संतोष यावलीकर यांना दिले. भाजपा महायुती घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) शेतकऱ्यांना सात बारा कोरा करण्याचे जाहीर नाम्यात उल्लेख केला होता. तसेच जाहीर प्रचार सभेत कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र महायुतीची सत्ता स्थापन होवून सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी कर्जमुक्तीबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. उलट महायुती घटक पक्षातील नेते शेतकऱ्यांना (Farmer)कर्ज भरणा करण्याचे सुतोवाच करीत आहे.
सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत
दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकनायक, शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे यांनी किसान ब्रिगेडची स्थापना करून कर्जमुक्ती अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती अर्ज तहसीलदार याजकडे सादर केले. वैश्विक तापमान बदलामुळे दरवर्षी येणारी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतीमालाचे भाव सतत पडले आहे. तसेच कृषी मालवरील जीएसटी (GST)आकारणी मुळे उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने आत्महत्या (Suicide) करण्यास परावृत्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती घटक सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत, यासाठी शेतकरी पेटून उठला आहे.
निवेदन देतेवेळी शेतकरी संतोष आनंदराव खुपसे, चैतन्यशील भावराव खुपसे, अशोक शामराव हांडे, पांडुरंग तुकाराम आखुड, किशोर बाबुलाल रुमकर, गजानन पांडुरंग देशमुख, विजय कृष्णा राठोड, कसनदास कनीराम पवार, प्रविण कसनदास पवार, विवेक मारोती काळेकर, पार्वतीबाई लक्ष्मण परस्कार्य, रामराव तुकाराम गटले, तुकाराम रघुजी गटले, महादेव गंगाराम घोडे, धनराज रामकृष्ण पेटकर, दैवीशील भावराव खुपसे, रविंद्र मोहन पवार, चंदाबाई रवींद्र पवार, कैलास वसंतराव चिस्तलकर आदीसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.