हिंगोली (Farmers Hunger strike) : हिंगोली तालुक्यातील सवड गावातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पाणंद रस्त्याच्या प्रश्नामुळे त्रस्त आहेत. सवड ते खंडोबा आणि सवड ते नरसी या पाणंद रस्त्यांवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण (Farmers Hunger strike) केल्यामुळे शेतात जाणे-येणे अवघड झाले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. या संदर्भात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी स्थळ पंचनामा देखील केला, मात्र अद्याप रस्ता खुला झालेला नाही.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी १४ ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात सरपंच गजानन थोरात यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ५० शेतकरी सहभागी झाले आहेत. यात राजकुमार थोरात, बळीराम थोरात, आकाश तारे, हनुमान पडोळे, ज्ञानेश्वर थोरात, विलास रत्नपारखी, अमोल तारे, सतीश थोरात, अशोक जावळे, ईश्वर जावळे, आणि रघुनाथ थोरात यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
जोपर्यंत रस्ता खुला होत नाही, तोपर्यंत (Farmers Hunger strike) उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष घालून तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.