चंद्रपूर (Chandrapur) :- किसान ब्रिगेडच्या माध्यमातून शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून कर्जमुक्तीसाठी अर्ज सादर करावयाच्या तिसर्या आणि अंतिम टप्प्यातही शेतकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल, चंद्रपूर तालुक्यात तहसिल कार्यालय गाठून अर्ज सादर केले.
किसान ब्रिगेडच्या माध्यमातून शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याची मोहीम सुरू
छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जमुक्तीसाठी अर्ज सादर करावयाचा पहीला टप्पा राबविण्यात आला होता. त्यावेळी शेकडो शेतकर्यांनी तालुका मुख्यालयी तहसिलदारांकडे कर्जमुक्तीचे अर्ज सादर केले. यावेळी शेकडो शेतकर्यांची झुंबड उडाली. त्यानंतर शेतकर्यांनी मागणी करून कर्जमुक्तीचे अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा दुसरा टप्पा राबविण्यात आला. यावेळी शेतकर्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. जे शेतकरी पहील्या व दुसर्या टप्प्यात अर्ज सादर करू शकले नाही त्यांच्यासाठी तिसरा टप्पा १९ जून ला राबविण्यात आला. तिसर्या टप्प्यातही शेकडोंच्या संख्येत शेतकर्यांनी कर्जमुक्तीच्या मागणीचे अर्ज तहसिलदारांमार्फत राज्य शासनाकडे पाठविले आहेत. तिसर्या टप्प्यातही शेतकर्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, वरोरा, चिमुर, नागभीड, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, चंद्रपूर तहसिल कार्यालयावर धडक देऊन उत्स्फूर्तपणे कर्जमुक्तीच्या मागणीचे अर्ज सादर केले.