निवडणुकीपूर्वी महायुतीने केला होता दावा
मानोरा (Farmers Loan waiver ) : विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी महायुतीने शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याची घोषणा केली होती. आता आज सोमवार दि. १६ डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. तेंव्हा आता (Farmers Loan waiver) शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीच्या घोषणेकडे लक्ष लागले आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहे. त्यात कापूस व सोयाबीनला भाव नाही. विधानसभा निवडणुकीपुर्वी महायुतीने कर्जमुक्ती देण्याचा दावा केला होता. आता नागपूर येथील अधिवेशनामध्ये सरकारकडून (Farmers Loan waiver) शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याच्या घोषणेची अपेक्षा आहे. यासोबतच कापसाला प्रती क्विंटल १० हजार रुपये दर, सोयाबीनला किमान हमीभाव देण्याची मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे.