कर्जबाजारीपणामुळे शेतकर्याची आत्महत्येकडे वाटचाल
भंडारा (Farmers Loan waiver) : उद्योगपतींना कर्जमाफी दिली जाते. शासकीय सेवेतील कर्मचार्यांची पगारवाढ केली जाते. मात्र शेतमालाला भाव मिळत नाही. ५ वर्षांपूर्वी मिळत असलेले भाव पुन्हा घटविले जाते व त्यात वाढ केली जात नाही. इंधनवाढीमुळे दुप्पट, तिप्पट शेतीमशागतीचा खर्च वाढत चालला आहे. रासायनिक खताचे भाव गगनाला भिडले आहे. वन्यप्राण्यांचे हल्ले शेतकर्यांवर होत आहेत. सर्पदंशामुळे सर्वाधिक (Farmers Loan waiver) शेतकर्यांचा जीव जात आहे. शेतकर्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास वाढत चालल्याने लाखो शेतकरी व त्यांच्या कुटुंबापुढे आता जगावे की मरावे हा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या वतीने उद्योगपतींना कर्जमाफी केली जाते. मात्र शेतकर्याशी दुजाभाव का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिकाचे उत्पादन घेताना शेतकर्यांना कर्जाची आवश्यकता भासते. लाखो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात येते. पण जेव्हा (Farmers Loan waiver) शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी पुढे येते तेव्हा मात्र शासन हात वर करून सरकारपुढे मोठे आर्थिक संकट असल्याचे सांगण्यात येते. सरकारची तिजोरी रिक्त झाली असे वारंवार सांगण्यात येते. मग उद्योगपतींचे कर्ज माफ करताना करोडो रुपये खात्यात टाकताना तिजोरीत पैसा कुठून येतो? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. उद्योगपतीचे कर्ज माफ करण्यासाठी कुठल्याही अटी ठेवल्या जात नाही.
२०२०-२०२४ या कालावधीत महाराष्ट्र सरकारने उद्योगपतीचे दीड लाख कोटी रुपये कर्ज माफ केल्याचे सांगण्यात येते. एकीकडे कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे तर दुसरीकडे सरकार उद्योगपतीचे कर्ज माफ करीत आहेत. आता तर कर्ज माफ करणे हे बरोबर नाही हे सांगत असले तरी मग उद्योगपतींना कर्जमाफी अन् शेतकर्यांशीच दुजाभाव का? असा प्रश्न शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे. (Farmers Loan waiver) कर्जाचा ओझा वाढत चालला आहे, हेच प्रामुख्याने शेतकर्याच्या आत्महत्येचे प्रमुख कारण ठरत आहे. कर्जमाफी होत नसल्याने शेतकर्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन शेतकर्याची कर्ज माफी करावी अशी मागणी नागो पिल्लारे, रामदास पडोळे, दौलत गजभिये यांच्यासह अनेक शेतकर्यांनी केली आहे.