विष्णुपंत भुतेकर
संस्थापक अध्यक्ष
भूमिपुत्र शेतकरी संघटना
रिसोड (Farmers Loan Waiver) : रिसोड तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात गेल्या मे महिन्यापासून सातत्याने अतिवृष्टीने (Heavy Rain) शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. शेतातील पेरलेली पिके सोयाबीन, तूर, हळद, उडीद, मूग, कापूस, भाजीपाला आणि फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आजपर्यंत सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. सरकार सातत्याने घोषणा करीत आहे. परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून काल रिसोड तहसील वर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. रिसोड तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, शेतकऱ्यांचे नियमित व थकीत पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, खरडून गेलेल्या जमिनीचे वेगळे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांचे वाहून गेलेले सिंचनाचे साहित्य त्याचा मोबदला देण्यात यावा, सिंचन करण्याकरता उभे केलेले सोलार व महावितरण ची यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे ते पूर्ववत उभी करण्यात यावी तसेच पीक नुसकाणीची मदत व क्षेत्र कमी केलेले सरकारने वाढवून दयावे. या सर्व शेतकरी हिताच्या मागण्या साठी भूमिपुत्र शेतकरी संघटने (Farmers Association) कडून संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर (Vishnupant Bhutekar) यांच्या नेतृत्वामध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला . लोणी फाट्यावरील स्वर्गीय पुंडलिकरावजी गवळी यांना पुष्पगुच्छ अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. पुंडलिक चौक येथून सुरू झालेला मोर्चा भाजी मंडी मार्गे आंबेडकर चौकात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून तहसील कडे रवाना झाला. अपेक्षे पेक्षा जास्त गर्दी झाल्या मुळे शासकीय यंत्रनेची तारांबळ उडाली. रिसोड तहसील कार्यालयासमोर आल्या नंतर मोर्चाचे भव्य सभेत रूपांतर झाले. यावेळी शेतकऱ्यांनी ‘एकच नारा सातबारा कोरा ‘ अशी प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दानानून सोडला. सभेच्या सुरुवातीला भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संघटक तथा राज्य प्रवक्ते डॉक्टर जितेंद्र गवळी, नंदू महाराज बाजड, गणेश महाराज हुंबाड, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार व शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी या भव्य मोर्चाला संबोधित करतांना, शेतकऱ्यांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानून पक्ष, जात, गट याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शेतकऱ्यांनी व शेतकरी युवकांनी गंभीरपणे पाहण्याची गरज असल्याचे सांगितले . रिसोड तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे सोबतच राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ झाले पाहिजे यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना सातत्यपूर्ण संघर्ष करणार असल्याचे सांगितले. सरकार आणि लोकप्रतिनिधी यांना शेतकऱ्यांचा विसर पडला असून शेतकऱ्यांची लढाई भूमिपुत्र हातात घेणार असल्याचे ते या वेळी म्हणाले. सरकारचा प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा होत असुन सरकारने त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. यापुढे हे खपवून घेतले जाणार नसून शेतकरी प्रश्ना साठी लढा तीव्र करण्याचे आव्हान उपस्थित हजारो शेतकऱ्यांना (Farmers) विष्णुपंत भुतेकर यांनी केले.
सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार!
मोर्चासाठी रिसोड तालुक्यातून प्रत्येक गावातील शेतकरी, शेतमजूर हजारोच्या संख्येने उपस्थित होते. भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या रवींद्र चोपडे, श्रीरंग नागरे, विकास झुंगरे, महावीर ठाकूर, ज्ञानबा बाजड, गजानन जाधव, पुरुषोत्तम रंजवे, गजानन सदार, वैजनाथ रंजवे, शंकर सदार, विकास आवले, ड्रा, अमर दहीहंडे,रवी जाधव, संतोष गव्हाणे, राजु डांगे, भीमराव खोडके, सीताराम लोखण्डे, विनोद जाधव, बालाजी बोरकर, प्यारेलाल नागरे, देव इंगोले, संतोष सुर्वे, विष्णू सरकटे, संतोष मानवतकर, सितराम इंगोले, विलास अवचार, विनोद जाधव, राजु खडसे, सितराम इंगोले, विनोद मावळ, शंकर हुंबाड, शफी भाई, धीरज उगले, किसन पिटकर, पप्पु हेंद्रे, संतोष खोडके, भागवत मामा बोडखे, पंढरी नरवाडे, नितीन गाडे,पवन खोंडकर, जगणं गरकल, मुरलीधर जुनघरे, ज्ञानेश्वर वाळूकर, बाजीराव हरकळ,मेहमूद भाई, संतोष भुतेकर, किशोर लाड, राजु काकडे, जगन देशमुख, शेख रहमान,बळीराम बोडखे, सह भूमिपुत्र च्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत करून शेतकऱ्यांचा मोर्चा यशस्वी करून दाखवल्याबद्दल विष्णुपंत भुतेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे (Activists) पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.