बार्शी टाकळी (Farmers Sabha) : जगाचा अन्नदाता मानवनिर्मित नैसर्गिक संकटा मुळे रोज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असल्याने, अनेक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. शासनाला शेतकऱ्यांच्या दुःखाचा विसर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताकरिता (Farmers Sabha) शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश भाऊ पोहरे (Prakash Pohare) यांनी पुढाकार घेत,आज 19 सप्टेंबरला शेतकरी लूट वापसी सभेचे आयोजन सुरु आहे. सदर (Farmers Sabha) सभेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन किसान ब्रिगेड (Kisan Brigade) बार्शीटाकली तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.
अकोल्यातील स्व.नामदेवराव पोहरे सभागृह, मराठा मंडळ, रामदासपेठ, अकोला येथे शेतकरी लूट वापसी सभेचे आयोजन सुरु आहे. सदर सभेला भारतीय किसान सभेचे बाहुबली नेता राकेश टिकैत (Rakesh Tikait) , प्रहार संघटनेचे बच्चू भाऊ कडू (Bachu Kadu) , किसान ब्रिगेडचे (Kisan Brigade) संस्थापक प्रकाश भाऊ पोहरे (Prakash Pohare) , ज्येष्ठ अर्थतज्ञ विश्वास उटगी, सामाजिक व राजकीय विश्लेषक आकाश जाधव, अखिल भारतीय किसान सभेचे अशोक ढवळे, संयुक्त किसान मोर्चाचे अजीत नवले, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, शेतकरी जागर मंचाचे प्रशांत गावंडे, शेतकरी कामगार पक्षाचे प्रदीप देशमुख, किसान सभेचे अजय भगत, किसान खेतमजुर संघटनेचे अनिल त्यागी, व्ही. कोटेश्वरराव, तेजिंदरसिंग वीरक, मंडल व्यंकन्ना, जय विदर्भ पार्टीचे अरुण केदार, (Kisan Brigade) किसान ब्रिगेडचे प्रांताध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर तसेच विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांनी सदर सभेला उपस्थित राहावे. अशा प्रकारचे आवाहन , बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष स्वप्निल पाटील मिरगे, विश्वास काकड यांनी केले आहे.