शेतकऱ्यांच्या जमीनी शासनाला जबरदस्तीने घेऊ देणार नाही-राजु शेट्टी
डोंगरकडा येथे प्रसार माध्यमांशी बोलले
डोंगरकडा (Shaktipeeth Highway) : या भागातून जाणाऱ्या नागपूर-गोवा या शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी शासनाला बळजबरीने घेऊ देणार नाही, अशी घोषणा करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी व परिसरातील शेतकऱ्यांनी (Shaktipeeth Highway) महामार्गासाठी सुरु असलेले जमीनीच्या चाचणीचे काम ९ एप्रिल रोजी बंद पाडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा नागपूर गोवा हा शक्तीपीठ राष्ट्रीय महामार्ग हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा परिसरातील जाणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग करत असतांना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनी अधिग्रहण केल्या जातील असे सरकारने यापूर्वी जाहीर केलेहोते. तथापी सरकारने जर पोलीस बळाचा वापर करून जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा यावेळी राजु शेट्टी यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी न्यायालयीन लढाई सोबतच तीव्र आंदोलन करण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी दाखविली. त्यामुळे सरकारने अशी दडपशाही करण्याऐवजी (Shaktipeeth Highway) शेतकऱ्यांशी चर्चा करावी आणि मगच पाऊल पुढे टाकावे अशी सुचनाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
डोगरकडा येथील शिवारातील (Shaktipeeth Highway) शक्तीपीठ महामार्गासाठी सुरु असलेली जमीन चाचणी प्रक्रिया बंद पाडून सदरील काम थांबवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश पोफळे, हरिभाऊ कदम कोंढेकर, राजेगोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकीने, दिगंबर गावंडे, पराग अडकीने, गजानन गणेशराव गावंडे, गजाननदत्तराव अडकीने, उद्धव गावंडे, आदी उपस्थित होते.