सरकारने दिलेले कर्ज माफीचे आश्वासन पुर्ण करावे!
कुरुंदा (Farmers) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सरकार विरोधात शेतकऱ्यांनी (Farmers) नाराजी व्यक्त करत दिवाळी सारखा मोठा सण काळा दिवस म्हणून साजरा करावा लागला. गेल्या महिन्यात मराठवाड्या मध्ये अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आणि शेतकऱ्यांच्या शेतातील पिक,माती सहीत वाहून गेले आणि शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असता सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंज्या स्वरूपात मदत जाहीर केली आणि दिवाळी गोड करू असं आश्वासन दिले मात्र अजून पण सरकाची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि मिळेल याची शाश्वती सुध्दा देता येणार नाही कारण दिवाळी सारखा सण असताना सरकार याचं गांभीर्य नाही म्हणून करूंदा व परिसरातील शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करत अन्नत्याग आंदोलन करून दिवाळी ला मदत आली नाही मात्र जेव्हा मदत येईल तेव्हा दिवाळी साजरी करू आज आमच्या वर संकट आहे हे संकट दुर करण्यासाठी आम्हाला सरकारने (Govt) दिलेले कर्ज माफी चे आश्वासन पुर्ण करावे.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत करावी!
रब्बी हंगामातील बियाणे उपलब्ध करून द्यावे. कुरूंदा व परिसरातील पुरामुळे घरात पाणी घुसले होते त्या कुटुंबांना तात्काळ मदत करावी. सरकारने हमी भाव खरेदी केंद्र सुरू करून माल खरेदी करावा व खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागले त्या शेतकऱ्यांना भाव फरक देण्यात यावा. अशा विविध मागण्यासाठी आलोक इंगोले पाटील यांनी आंदोलन केले असताना परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी भेटी दिल्या.