चिखली बनावट बियाणे

चिखली तालुक्यात बनावट बियाणांचा फटका; ४५ हेक्टरवरील सोयाबीनची उगवणच नाही, ४४ तक्रारी कृषी विभागाकडे

Chikhli Spurious Seeds: सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका; सोयाबीनची उगवण न झाल्याने कृषी विभागाकडे ४४ तक्रारी दाखल, अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले

चिखली तालुक्यात बनावट बियाणांचा फटका; ४५ हेक्टरवरील सोयाबीनची उगवणच नाही, ४४ तक्रारी कृषी विभागाकडे

Chikhli Spurious Seeds

 

अनेक शेतकऱ्यांनी तक्रार न करताच केली दुबार पेरणी;
शिवसेनेचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

चिखली (Chikhli Spurious Seeds) : चिखली तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यात तब्बल ४५ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनची उगवण न झाल्याने कृषी विभागाकडे ४४ तक्रारी दाखल झाल्या असून, उशिरा होत असलेल्या पेरणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी तक्रार न करताच दुबार पेरणी केल्याचे समोर आले आहे.

हरणी, वळती, खंडाळा मकरध्वज, वैरागड, उदयनगर, वाघापूर, नायगाव, अंचरवाडी, एकलारा, अमडापूर, कवठळ आदी गावांतील शेतकऱ्यांनी पेरणीनंतर १० ते १२ दिवस उलटूनही सोयाबीनची उगवण न झाल्याची तक्रार केली आहे. काही शेतकऱ्यांनी शेतातील माती उकरून पाहिल्यानंतर (Chikhli Spurious Seeds) बियाणे जमिनीतच कुजल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून अतिरिक्त आर्थिक भार सहन करण्याची वेळ आली आहे.

कृषी विभागाने प्राप्त तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली असून अनेक प्रकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. संबंधित बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत असून अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

प्राथमिक माहितीनुसार महाबीज (सीड प्रॉडक्शन) – १६, अंकुर सीड्स – १४, पार्श्व (Enoveg) – ७, बूटर्स – २, रवि सीड्स – २, ईगल – १, ईगल सीड्स अँड बायोटेक – १, दत्तारी – १ आणि बन्सल – १ अशा विविध कंपन्यांच्या बियाण्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांनी सांगितले की, "सोयाबीन उगवण न झाल्याबाबत ४४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मी स्वतः तसेच मंडळ कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत आहोत. तालुकास्तरीय समितीकडूनही प्रत्यक्ष तपासणी सुरू असून संबंधित बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. अहवालात बियाणे दोषपूर्ण आढळल्यास संबंधित कंपनीविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल."

शिवसेनेचा तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव

१० जुलै रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला घेराव घालून निवेदन सादर करण्यात आले. युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे, शहर संघटक प्रीतमभाई गैची, युवासेना शहरप्रमुख आनंद गैची यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

निवेदनात बोगस व निकृष्ट दर्जाचे बियाणे (Chikhli Spurious Seeds) विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई, परवाने रद्द करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत व पर्यायी बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे, शहरसंघटक प्रीतमभाई गैची, युवासेना शहरप्रमुख आनंद गैची, जिल्हाप्रमुख अशोक राजपूत, शिवसेना नेते लालसिंग मोरे, सखाराम पाटील, उपतालुकाप्रमुख राहुल मिसाळ, हरी इंगळे, छगन वानखेडे, निवृत्ती घुबे, शुभम वानखेडे, उपशहर प्रमुख समाधान जाधव, रवी पेठकर, पुंजाजी शेळके, अनिल जावरे, सोहेल शहा, किसान सेना प्रमुख नारायण वाणी, अशोकराव मोहिते, दिनकर मोरे, गजानन डुकरे, लक्ष्मण इंगळे, राजू इंगळे, अंकुश इंगळे, संजय कदम, प्रदीप सपकाळ, गजानन फोलाने, दत्ता महिंद, कृष्णा फोलाने, गौतम गवई, संजय सोळंकी, सिद्धेश्वर सोळंकी, सोपान भालेकर, सुरज असोलकर, किशोर महाले, इम्रान शेख, अशोकराव भोसले, मालोजी गुजर, डॉ. प्रकाश काळे, सुपडाजी कोऱ्हाळे, गजानन काकडे, सचिन जोशी, सिद्धेश्वर ठेंग, वैभव ठेंग, प्रदीप गरुड, वसंतराव चौरे, रामदास जाधव, अंकुश डहाके, राजू लोखंडे, शिवाजी पंडित, गणेश वाघमारे, समाधान गायकवाड, कैलास गायकवाड, प्रल्हाद पवार, गजानन शेळके, समाधान पाटील, मंगेश मोळवंडे, तुषार वजगडे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी वळती येथील दुबार पेरणीग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, "निकृष्ट व बनावट सोयाबीन बियाण्यांमुळे (Chikhli Spurious Seeds) शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा पैसा, वेळ आणि मेहनत वाया गेली आहे. कृषी विभागाने केवळ पंचनामे करून थांबू नये. संबंधित बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. बाधित शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण नुकसानभरपाई, दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत आणि मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडेल. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ."

संबंधित सामग्री

चिखलीतील कट्टर शिवसैनिक, माजी तालुकाप्रमुख विश्वासराव खंडागळे (बाळासाहेब) यांचे अल्पशा आजाराने निधन

चिखलीतील कट्टर शिवसैनिक, माजी तालुकाप्रमुख विश्वासराव खंडागळे (बाळासाहेब) यांचे अल्पशा आजाराने निधन

Vishwasrao Khandagale passes away: ज्येष्ठ शिवसैनिक आणि चिखली पंचायत समितीचे माजी सदस्य विश्वासराव प्रल्हादराव खंडागळे यांचे आज, २६ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन

Aug 26, 2026
दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग!

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग!

Marathwada Farmers' Protest: पावसाची अनिश्चितता, शेतीमालाला अपेक्षित भावाचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर महामार्गावर उद्रेक

Aug 23, 2026
पोतरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शेतकर्‍यांनी ठोकले कुलूप

पोतरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शेतकर्‍यांनी ठोकले कुलूप

Potara Veterinary Clinic: कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावात पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी हजर नसल्याने गायीवर योग्य उपचार न झाल्याने तिचे वासरू दगावल्याची संतापजनक घटना घडली

Aug 20, 2026
परभणीत आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

परभणीत आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

Parbhani Dharane Protest: केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी व जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. तसेच चार कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करण्याच्या मागणी

Aug 11, 2026
..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

Hingoli Farmers' March: शेतकरी कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांना हिंगोलीत आणून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

Aug 04, 2026